Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत फटाक्यांचा बेफाम खेळ! रस्त्यावर हुल्लडबाज तरुणांचा जीवघेणा प्रकार

कोपरखैरणे सेक्टर 20 मधील काही हुल्लडबाज तरुण भर रस्त्यात इतरांना इजा किंवा एखादा अनर्थ घटना होईल अश्या पद्धतीने फटाके फोडत आहेत.नवी मुंबईत झालेल्या 2 वेगवेगळ्या आगीच्या घटनेत एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 22, 2025 | 06:08 PM
कोपरखैरणेत फटाक्यांचा बेफाम खेळ! रस्त्यावर हुल्लडबाज तरुणांचा जीवघेणा प्रकार

कोपरखैरणेत फटाक्यांचा बेफाम खेळ! रस्त्यावर हुल्लडबाज तरुणांचा जीवघेणा प्रकार

Follow Us
Close
Follow Us:
  • हुल्लडबाज तरुण भर रस्त्यात फटाके फोडतात
  • 2 वेगवेगळ्या आगीच्या घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू
  • नवी मुंबईत दिवाळी सणाला गालबोट

सावन वैश्य , नवी मुंबई: दिवाळी म्हटलं की लहान मुलांच्या आनंदाला पारावार राहत नाही. फराळ खाऊन आणि फटाके वाजवून बच्चे कंपनी आपली दिवाळी साजरी करते. पण अशा वेळी काही अपघात घडून आपल्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता असते. दरम्यान, कोपरखैरणेमध्ये फटाके फोडताना नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातो. कोपरखैरणे सेक्टर 20 मधील काही हुल्लडबाज तरुण भर रस्त्यात इतरांना इजा किंवा एखादा अनर्थ घटना होईल अश्या पद्धतीने फटाके फोडत आहेत. नवी मुंबईत झालेल्या 2 वेगवेगळ्या आगीच्या घटनेत एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे नवी मुंबईत दिवाळी सणाला गालबोट लागले आहे.

दिवाळीच्या दिवशी चार लेकरं झाली अनाथ, पालकांच्या भयानक कृतीमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा

असं असताना देखील काही हुल्लडबाज तरुण फटाके नियमित पद्धतीने फोडण्याचं सोडून फटाक्यांसोबत खेळ खेळत आहेत. त्यांचा हाच खेळ एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. काल रात्री लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोपरखैरणे सेक्टर 20 मध्ये काही हुल्लडबाज तरुण नागरिकांच्या जीवावर बेतेल अश्या प्रकारे फटाके फोडत होते. या तरुणांनी रॉकेट रस्त्यावर आडवा ठेऊन पेटवणे, रॉकेट हातात धरून पेटवणे, अश्या प्रकारच्या जीवघेणा प्रकार कोपरखैरणे मध्ये रात्री सुरु होता. विशेष म्हणजे रहिवाशांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असतानाच हा प्रकार सुरु होता. त्यामुळे अश्या हुल्लडबाज तरुणांवर संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. नवी मुंबईत नुकत्याच दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यांचे कारण जरी अद्याप समोर आले नसले तरी, अश्या प्रकारे फटाके फोडणे एखाद्या आगीचे कारण होऊ नये म्हणजे झालं… त्यामुळे या तरुणांवर ताबडतोब कारवाई करावी…. नाहीतर यांचा खेळ होईल आणि एखाद्याचा जीव जाईल.

या प्रकारानंतर कोपरखैरणे पोलिसांनी काही व्यक्तींविरोधात प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन घेतली आहे. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अजून प्रत्यक्ष समज दिली नाही. स्थानिकांचा प्रश्न आहे की, “नेमके हे लोक कोण आहेत? पोलिस त्यांची ओळख पटवून कारवाई करतील का? केवळ प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन सांगून विषय संपवला जाणार का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांवर फक्त समज न देता कठोर पाऊल उचलावे. तसेच, पालकांनीही आपल्या मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. “आज खेळ वाटतोय, पण उद्या दुर्घटना घडली तर आयुष्यभराचं दुःख होईल, नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. फटाके सुरक्षित ठिकाणी, निर्धारित वेळेत आणि नियमांचे पालन करूनच फोडावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

फरार मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड जेलमध्ये खास व्यवस्था! आतील फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

Web Title: Unrestrained fireworks display in koparkhairane reckless young people creating a deadly situation on the street

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • Diwali
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

दिवाळीच्या दिवशी चार लेकरं झाली अनाथ, पालकांच्या भयानक कृतीमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा
1

दिवाळीच्या दिवशी चार लेकरं झाली अनाथ, पालकांच्या भयानक कृतीमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा

Navi Mumbai Crime : कळंबोलीत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई , 15.83 लाखांचा हेरॉईन आणि गांजा जप्त
2

Navi Mumbai Crime : कळंबोलीत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई , 15.83 लाखांचा हेरॉईन आणि गांजा जप्त

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा; ट्रम्प यांनी हिंदूंना शुभेच्छा देत पुन्हा केला PM मोदींसोबत संवादाचा दावा
3

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा; ट्रम्प यांनी हिंदूंना शुभेच्छा देत पुन्हा केला PM मोदींसोबत संवादाचा दावा

Bhaubeej 2025: भाऊबीजेला बहीण भावाला नारळ का देते? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व
4

Bhaubeej 2025: भाऊबीजेला बहीण भावाला नारळ का देते? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.