8 वर्षांची मुलगी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली (फोटो सौजन्य-X)
वाराणसीमध्ये सकाळी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शाळेच्या आत मृतदेह सापडला असून मुलगी एक दिवशी आधी संध्याकाळी बेपत्ता होती. हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजाबादचे आहे. येथील रहिवासी असलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृतदेह बुधवारी सकाळी बहादूरपूर येथील प्राथमिक शाळेत गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. रामनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
माहिती देताना अपंग वडिलांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समाधीजवळील दुकानातून सामान आणण्यासाठी घरातून निघाली होती. ती मच्छरचं कॉइल घेण्यासाठी बाहेर गेली होती.
उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिचा शोध सुरू होता. ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यावेळी पोलिसांना ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात आलं. मंगळवारी सायंकाळपासून मुलीचा शोध सुरू होता. बुधवारी सकाळी बहादूरपूर गावातील प्राथमिक शाळेच्या आवारात एका गोणीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
शाळेच्या आवारात एका गोणीत मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घरापासून जाणाऱ्या मार्गांवर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. या आधारे रामनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी राजू सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुलगी दोन ठिकाणी एकटी जाताना दिसली. समोरील कॅमेऱ्याचे फुटेज काढले जात आहे. त्यानंतरच इतर माहिती उपलब्ध होईल. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खून आणि अत्याचाराचे कारण स्पष्ट होईल.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावातीलच प्राथमिक शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 10 वाजता ती शाळे जाण्यासाठी घरून निघाली. मात्र घरी परतलीच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.