वाघोलीत गोळीबाराची घटना (फोटो- istockphoto)
पुणे: कोयत्यांची जागा हळूहळू पिस्तूलांनी घेण्यास सुरूवात केली असून, त्यातून बार उडवत दहशत देखील माजवली जात आहे. वाघोलीत पहाटेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या घरावर पहाटे गोळीबार केला आहे. तब्बल ९ गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी लोणीकंद (वाघोली) पोलीस ठाण्यात निलेश सुभाष सातव (वय ३३) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्ल्या माहितीनुसार, निलेश सातव हे वाघोलीतील वडजाई वस्तीत राहण्यास आहेत. ते शेतकरी असून, त्यांची मोठी शेती आहे. त्यांचा जमीन खरेदी व विक्रीचे देखील व्यवहार आहेत. कुटूंबासह तेथे राहण्यास आहेत. दरम्यान, मध्यरात्री सव्वा चारच्या सुमारास सातव कुटूंबासह घरात झोपलेले असताना त्यांच्या घराजवळ येऊन एकाने खिडकीतून त्यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने ते या गोळीबारातून बचावले गेले. गोळी त्यांना लागली नाही.
मात्र, पहाटेच्यावेळी गोळीबार झाल्याने वस्तीवर चांगलाच गोंधळ उडाला होता. अचानक गोळीबार झाल्याने दहशतीचे देखील वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाणअयाचे वरिष्ठ निरीक्षक पंडीत रेजीतवाड तसेच गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने धाव घेतली. दरम्यान, सातव यांचे कोणाशी वाद किंवा जुने वाद तसेच इतर काही नाही. त्यानंतरही गोळीबार झाल्याने नेमका हा गोळीबार कसा झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण
नगर रस्त्यावरील डंपरने कामगारांना चिरडल्याप्रकरणात पोलिसांनी डंपर मालकाला अटक केली आहे. त्याने निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवून त्याला अटक केली आहे. अनिल काटे (३९) असे अटक करण्यात आलेलया डंपर मालकाचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा नोंद आहे. नगर रस्त्यावरील वाघोली चौकात भरधाव डंपर चालकाने मध्याच्या नशेत फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडले होते. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झालेले आहेत. यात एक तरुणी गंभीर असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा: वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण; पोलिसांकडून मालकावर अटकेची कारवाई