
crime (फोटो सौजन्य: social media)
उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश मधून एक चकित करणारा प्रकार समोर आले आहे. एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देणार असल्याचे समोर आले आहे. हे तेवहा घडलं जेव्हा त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरु असल्याचे त्याला समजलं. त्याला हे कळताच त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवलं आणि दोघांनाही लग्न करण्यास सांगितलं. इतकेच नव्हे तर, आपण तिघे एकत्र खूश राहू, असं तो तरुण पत्नीला म्हणाला. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून तुम्हीही चकित व्हाल
पोलिस ठाण्यात अॅप्लिकेशन
या प्रकरणातील व्यक्तीने पोलीस स्टेशन अॅप्लिकेशन केलं आणि म्हणाला की, तो त्याच्या पत्नीचं लग्न स्वतःच्या मर्जीने तिच्या प्रियकराशी करू इच्छितो आणि यावर तो आनंदी असून त्याचं संपूर्ण कुटुंब सुद्धा याच्याशी सहमत आहे. तसेच, भविष्यात त्याच्या पत्नी आणि प्रियकराला त्रास देणार नसल्याचं देखील त्याने अॅप्लिकेशनमध्ये सांगितलं. जर, पत्नी किंवा प्रियकराला त्याच्याकडून त्रास झाला तर पोलीस यावर कायदेशीर कारवाई करू शकत असल्याचं त्याने म्हटलं. तरुणाच्या या निवेदनामुळे पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मेरठमधील असल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
१५ वर्षांपूर्वी त्याचं लग्न प्रयागराजमध्ये राहणाऱ्या एका मुलीशी झाला होता. दोघांच्याही वयामध्ये जवळपास 10 वर्षांचं अंतर आहे. लग्नानंतर दोघांना तीन मुलं देखील झाली. ते आपलं सुखी संसार जगत होते. दरम्यान त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणासोबत त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल त्याला ६ वर्षांपूर्वी माहिती मिळाली. याबाबत, त्याने पत्नीला जाब विचारला असता तिने सांगितलं की ती तिच्या प्रियकराला सोडून अजिबात राहू शकत नाही आणि तिला तिच्या प्रियकरासोबतच लग्न करायचं आहे. सुरूवातीला, पतीने आपल्या पत्नीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण, तिने आपल्या पतीचं अजिबात ऐकलं नाही. शेवटी, पतीने आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
माझ्या पत्नीला सुद्धा मी तिच्यासोबत एकाच घरात राहावं, असं वाटत आहे. त्यामुळे, मी सुद्धा या घरात राहीन, पण मी दुसरं लग्न करणार नाही. आता मी माझ्या पत्नीच्या आठवणींमध्येच जगेन. त्यांचा संसार थाटण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करत आहे. मी फक्त त्यांच्यासाठी हे करूच शकतो आणि मी ते केलं. कोणताही धर्मगुरू हे लग्न लावून देण्यास तयार नाही. आता मी माझ्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याच्या प्रयत्नात दिल्लीला जाऊन तिथल्या धर्मगुरूंशी बोलणार आहे. असे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे.
Ans: उत्तर प्रदेश
Ans: मेरठ
Ans: लग्न