प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून
चंदीगड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण असताना हरयाणामधून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची आवड असलेल्या एका महिलेने तिच्या प्रियकराला सोबत घेऊन पतीची हत्या केली. एवढेच नाही तर त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महिलेच्या पतीने तिला दुसऱ्या एका युट्यूबरसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रवीण या व्यक्तीचा मृतदेह मध्यभागी ठेवलेला दिसत आहे. चालकाने हेल्मेट घातले असून, त्याची पत्नी रवीनाने तिचा चेहरा झाकलेला आहे. सुमारे दोन तासांनंतर, ती त्याच बाईकवर मागे बसून परतताना दिसते. तर, मृतदेह नंतर दिसत नाही. दोघांनी प्रवीणचा मृतदेह त्याच्या घरापासून सुमारे 6 किमी अंतरावर असलेल्या दिनौड रोडवरील नाल्यात फेकून दिला होता. यानंतर, 28 मार्च रोजी पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह ताब्यात घेतला.
कृत्य सीसीटीव्हीत कैद
रवीनाची सुरेशशी भेट होण्यासाठी सोशल मीडिया माध्यम बनले. इन्स्टाग्रामवर कनेक्ट झाल्यानंतर दोघांनी सुमारे दीड वर्ष एकत्र कंटेंट तयार केले. प्रवीण यावर आक्षेप घेत होता. यादरम्यान, रवीना आणि सुरेशने हत्येशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत. पतीच्या हत्येनंतरही रवीनावर विशेष परिणाम झाला नसल्याचे आता सांगितले जात आहे.
सुरेश हा रविनाचा प्रियकर
सुरेश हा रवीनाचा प्रियकर असल्याचे समजते. तिसरा रवीनाचा पती प्रवीण. तो जुना बस स्टँड परिसरातील गुजरों की धानी येथील रहिवासी होता. रवीना आणि सुरेश बराच काळ एकमेकांच्या संपर्कात होते. २५ मार्च रोजी प्रवीणने दोघांनाही घरात आक्षेपार्ह स्थितीत पकडले. यानंतर तिघांमध्ये जोरदार भांडण झाले. यात रवीना आणि सुरेश यांनी मिळून प्रवीणचा ओढणीने गळा दाबून खून केला.