"सूर्यकुमार यादव जर तुमच्यात हिंमत असेल तर...", भारत-पाकिस्तान सामन्यानंतर 'आप'ने दिले मोठे आव्हान
भारताने आशिया कप २०२५ मधील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला १२७ धावात गुंडाळलं. त्यानंतर हे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात. १५.३ षटकात पार करत आपला सगल दुसरा विजय साजरा केला. मात्र यंदाचा भारत – पाकिस्तान सामना हा इतरवेळेच्या भारत पाक सामन्यासारखा नव्हता. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची त्याला पार्श्वभूमी होती. भारतातून हा भारतानं या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी जोरदार मागणी होती. याचदरम्यान आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर आम आदमी पक्ष सातत्याने नाराजी व्यक्त करत आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे प्रमुख सौरभ भारद्वाज यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय आणि आयसीसी यांना मोठे आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर तुमच्यात हिंमत असेल तर पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या शहीदांच्या पत्नींना भारत-पाकिस्तानमधून मिळवलेले पैसे देऊन दाखवा.
सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, सूर्यकुमार यादव, जर तुमच्यात हिंमत असेल तर, आणि जर तुमच्या बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये हिंमत असेल तर, त्यांच्या प्रसारण मार्गातून आणि या संपूर्ण व्यवसायातून तुम्ही जे काही पैसे कमवले आहेत ते शहीदांच्या विधवांना द्या. आम्ही देखील मान्य करू.. . पण त्यांच्यात हिंमत नाही. आम्ही त्यांना समर्पित केले आहे असे खोटे काहीही म्हणा, आम्ही ते त्यांना समर्पित केले आहे.
सौरभ भारद्वाज म्हणाले, हा सामना दिल्लीच्या कोणत्याही सोसायटी किंवा आरडब्ल्यूएमध्ये प्रसारित झाला नव्हता. दिल्लीतील सर्व क्लब आणि रेस्टॉरंट्सनी त्यांच्या ठिकाणी हा सामना दाखवला नाही.
भारतीय संघाच्या विजयानंतरही दिल्लीतील लोकांनी काल फटाके फोडले नाहीत आणि भाजप सरकारला मोठा संदेश दिला आहे. ते म्हणाले, देशातील सर्व विरोध असूनही, भाजप सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आयोजित केला परंतु तिकिटे खरेदी करूनही अनेक भारतीय सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले नाहीत. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यावर बहिष्कार टाकून लोकांनी केंद्र सरकारला संदेश दिला आहे की ते चुकीचे करत आहे, अशी टिका सौरभ भारद्वाज यांनी केली.