दिल्ली-एनसीआर बनतंय 'गॅस चेंबर'; हवेची गुणवत्ता धोकादायक स्थितीवर, दिल्लीचा AQI...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. त्यातच दिवाळीच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी गाठली आहे. राजधानी ‘गॅस चेंबर’ बनली आहे. या प्रदुषणामुळे डोळ्यांची अक्षरश: जळजळ होताना दिसत आहे. सोमवारी 38 पैकी 34 निरीक्षण केंद्रांनी ‘रेड झोन’मध्ये प्रदूषण पातळी नोंदवली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ आणि ‘गंभीर’ श्रेणींमध्ये आहे. सध्या, संपूर्ण शहरासाठी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 531 आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मते, जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 317 नोंदवली गेली. सकाळी आयटीओ येथे हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २५९ नोंदवली गेली, जो ‘खराब’ श्रेणीत येतो. दिल्लीतील आरके पुरमच्या आसपासचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 368 नोंदवला गेला, जो ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत येतो.
दिल्लीच्या नरेला परिसरात ५५१ चा AQI नोंदवला गेला, जो सर्वाधिक नोंदवला गेला. अशोक विहारमध्येही ४९३ चा हवेचा दर्जा नोंदवला गेला. आनंद विहारचा AQI ३९४ वर पोहोचला. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये ३६९ चा AQI नोंदवला गेला, तर गाझियाबादमध्ये ४०२ चा AQI नोंदवला गेला, जो ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत येतो.
हेदेखील वाचा : Air Quality in Delhi : राजधानी दिल्लीत प्रदूषण पुन्हा वाढतंय; प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता, GRAP चा दुसरा टप्पा (GRAP-2) प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे.
GRAP-2 का गरजेचा?
GRAP-2 च्या अंमलबजावणीसह, दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर पातळीला तोंड देण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या टप्प्यात प्रामुख्याने वायू प्रदूषणात योगदान देणाऱ्या बाबींवर मर्यादा घालणे समाविष्ट आहे. यामध्ये बांधकाम इतर घडामोडींवर नियंत्रण ठेवणे असणार आहे. विशेषतः धूळ निर्माण करणाऱ्या बाबींवर लक्ष दिले जाणार आहे.
रविवारीही हवेच्या गुणवत्तेत मोठा बदल
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी शहरातील अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘गंभीर’ आणि ‘खराब’ या श्रेणींमध्ये नोंदवली गेली आहे.