Ayodhya
उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसएसएफ (SSF) जवानाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (19 जून) पहाटे ५.२५ वाजता समोर आली आहे. शत्रुघ्न विश्वकर्मा असे या सैनिकाचे नाव होते.
२५ वर्षीय शत्रुघ्न हे आंबेडकर नगर येथील रहिवासी होता. सकाळी राममंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकून सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना शत्रुघ्न रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. सहकारी सैनिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमी जवानाला ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यांन डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या जवानाच्या मृत्यूने अयोध्या मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. आयजी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी स्वत: घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून तपास केला. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण मानले जात आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
शत्रुघ्न विश्वकर्मा 2019 च्या बॅचचे होते. आंबेडकर नगर येथील सन्मानपूर पोलीस ठाण्याच्या काजपुरा गावचा रहिवासी होतो. SSF मध्ये तैनात होते. मंदिराच्या सुरक्षेसाठी योगी सरकारने चार वर्षांपूर्वी एसएसएफ दलाची स्थापना केली होती. मृत जवानाच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, घटनेपूर्वी शत्रुघ्न मोबाईलकडे पाहत होता. त्यालाही काही दिवसांपासून कशाची तरी काळजी वाटत होती. पोलिसांनी त्याचा मोबाईलही तपासासाठी पाठवला आहे. पोलिसांनी मृत जवानाच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत.शत्रुघ्न आता या जगात नाही यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही.