मुंबई : आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला (SSC Result 2022). यंदाच्या निकालातही अशा काही गमतीजमती झाल्या आहेत. यावर्षीच्या निकालातही मुलींचा वरचष्मा असला तरी मुलेही या टक्केवारीत मागे नाहीत. जगात जरी आश्चर्यकारक गोष्टी अस्तित्वात असल्या तरी जुळी मुलं (Twins) म्हटली की, त्याच्या आयुष्यातही अनेकदा गमतीजमती घडत असतातच पण भांडूप (Bhandup, Mumbai) येथील पेपर विक्रेते (Paper Seller) धनाजी ढगे (Dhanaji Dhage) यांच्या जुळ्या मुलांनीही यंदा दहावीच्या निकालात अशीच गंमतजंमत केली आहे.
[read_also content=”होय, यंदा हे घडलंय! दहावी निकालात २२ मुलांना पैकीच्या पैकी टक्के गुण, २९ शाळांना मिळालेत (भोपळा) शून्य टक्के! https://www.navarashtra.com/education/yes-it-happened-this-year-in-the-10-th-result-22-children-got-hundred-percent-marks-out-of-29-schools-got-zero-percent-nrvb-293616.html”]
[read_also content=”यंदा दहावीचा 96.94 टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल, तर पुन्हा मुलीच अग्रेसर https://www.navarashtra.com/maharashtra/this-year-96-94-percent-result-of-10th-class-konkan-division-is-at-the-top-293630.html”]
साहिल धनाजी ढगे (Sahil Dhanaji Priya Dhage) आणि सौरव घनाजी ढगे (Saurav Dhanaji Priya Dhage) या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत ८७.२० टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. वडील धनाजी ढगे हे वृत्तपत्र व्यवसाय विक्रेते असले तरी त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एका बापाने जे करायला हवं ते सगळं केलं आहे आणि मुलांनीही आपल्या ‘बापमाणसा’वरचा हा विश्वास सार्थ ठरवत दहावीच्या परिक्षेत यशाला गवसणी घातली आहे. भांडूप परिसरात हे दोन्ही विद्यार्थी सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.