Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी मतदारांची निघाली भव्य पदयात्रा; जुळे सोलापूरकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

पदयात्रा मार्गस्थ होताना धर्मराज काडादी यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करुन मतदारांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. जुळे सोलापूर परिसरातील विविध नगरांमध्ये सुवासिनींनी औक्षण केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 12, 2024 | 07:42 AM
धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी मतदारांची निघाली भव्य पदयात्रा; जुळे सोलापूरकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी मतदारांची निघाली भव्य पदयात्रा; जुळे सोलापूरकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी जुळे सोलापुरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडादी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर सुवासिनींनी औक्षण करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्पदेखील यावेळी करण्यात आला.

दुपारी साडेतीन वाजता जुना विजापूर नाका येथून ढोल-ताशाच्या निनादात ही भव्य पदयात्रा निघाली. श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय, श्री सिध्देश्वर परिवाराचा विजय असो, निवडून निवडून येणार कोण, काडादी साहेबांशिवाय दुसरे कोण, हवा कुणाची, काडादी साहेबांची, काडादीसाहेब तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, काडादी साहेबांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या.

धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलकदेखील होते.

पदयात्रा मार्गस्थ होताना धर्मराज काडादी यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करुन मतदारांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. जुळे सोलापूर परिसरातील विविध नगरांमध्ये सुवासिनींनी औक्षण केले. ठिकठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी स्वागत केले. या मतदारांना काडादी यांनी मतदारांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्या आवाहनाला मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी अनेक नगरांतील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काडादी यांचे माहितीपत्रक देऊन कॉम्प्युटर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सिकंदरताज पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील-कुडल, विद्यासागर मुलगे, बाळासाहेब पाटील, शरणराज काडादी, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुस्लीम समाजाकडून स्वागत

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या जुळे सोलापुरातील पदयात्रेदरम्यान त्यांचे विविध समाज बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुस्लीम समाज बांधवांनीही काडादी यांचे स्वागत करुन त्यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

पदयात्रेत महिलांचा सहभाग

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या भव्य पदयात्रेत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पदयात्रेदरम्यान त्यांनी महिला मतदारांना काडादी यांच्या माहितीपत्रकाचे वाटप करुन मतदानादिवशी काडादी यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या कॉम्प्युटरसमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

‘कॉम्प्युटर’ चिन्ह पोहोचले घरोघरी

आधुनिक युगात कॉम्प्युटरशिवाय कोणतेही कामशक्य नाही. या कॉम्प्युटरचे महत्त्व आता सर्वांनाच पटले आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचे निवडणूक चिन्ह कॉम्प्युटरच आहे. प्रचार, पदयात्रा, बैठका, सभा, माहितीपत्रके, सोशल मीडिया, वृत्तपत्र या माध्यमातून काडादी यांचे कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह मतदारसंघातील घरोघरी पोहोचले आहे.

Web Title: A grand procession of voters for dharmaraj kadadi victory jule solapur gave a spontaneous welcome nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 07:42 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Solapur News

संबंधित बातम्या

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…
1

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात
2

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन
3

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी
4

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.