Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायचे असेल तर…’; आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं मोठं विधान

घोरपडी भागात गेली 40 वर्ष रेल्वे फाटक लागल्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. ती समस्या आपण येथील नगरसेवकांसह चर्चा करून सोडवली. येथील पाण्याचा प्रश्न निकाली काढला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2024 | 10:22 AM
'महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायचे असेल तर...'; आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं मोठं विधान

'महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायचे असेल तर...'; आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ‘महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायचे असेल तर महाराष्ट्रात स्थिर सरकार गरजेचे आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक मोठी कामे केली जात आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवेल. तर 5 मिलियन डॉलरसह महाराष्ट्र भारत देशाला जगातील तिसरी महत्त्वाची अर्थव्यवस्था बनायला मदत करेल. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन जनसेना पक्षाचे नेते आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केले.

हेदेखील वाचा : “… केवळ आपली पोळी भाजण्याचे काम महाविकास आघाडीने केले”; योगी आदित्यनाथांची विरोधकांवर सडकून टीका

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ घोरपडी येथे पवन कल्याण यांच्या जाहीरसभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘सनातन धर्माचं स्वप्न साकार करा. मागील दहा वर्षात एनडीए सरकारने  देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. याशिवाय काश्मिरमधील कलम 370 हटवले, आयोध्येत श्री रामांचे आगमन झाले आहे. जागतिक पातळीवर आधी नव्हे ते आपल्या देशाचे राजकीय, सामाजिक अस्तित्व बळकट झाले आहे. यातून देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुनील कांबळे म्हणाले, घोरपडी भागात गेली 40 वर्ष रेल्वे फाटक लागल्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. ती समस्या आपण येथील नगरसेवकांसह चर्चा करून सोडवली. येथील पाण्याचा प्रश्न निकाली काढला. कोरोनाच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांनी 18-18 तास काम केले. त्यामुळे पुढील काळात ही विकासाच्या बाजूने येथील नागरिक मतदान करतील, असा मला विश्वास आहे.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी म्हणाले, हजारो लोकांनी बलिदान देऊन सनातन धर्म आणि राष्ट्राची रक्षा केली. आज आपली संस्कृती टिकून आहे, ती केवळ आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळे. मात्र, स्वतंत्र भारतात राष्ट्र, धर्म, संस्कृती टिकवण्यासाठी बलिदान देण्याची गरज नाही; फक्त मतदान करा. तुमची सुरक्षा आता तुमच्या हातात आहे. तुमचं एक मत तुमचं भविष्य घडवणार आहे.

हेही वाचा: आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात ! योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

20 ला मतदान तर 23 ला निकाल

या निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान घेतले जाणार आहे तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी कोल्हापुरात प्रचारसभा घेतली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.

Web Title: A stable government is needed in maharashtra says ap dy cm pawan kalyan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 10:22 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.