नंदूरबार : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दिल्लीतील नेते राज्यामध्ये प्रचारासाठी आले आहेत. पंतप्रधान मोदींची अकोल्यामध्ये सभा पार पडली आहे तर अमित शाह हे देखील जोरदार प्रचारसभा घेत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे प्रतिष्ठेची बनली आहे. विधानसभेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्र्वादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार सभा, रॅली आणि बैठका घेत आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जोरदार तयारी व प्रचार करत आहे. निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार गटामध्ये अनेक बड्या नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि इच्छुकांचे पक्षप्रवेश झाले आहेत. मात्र आता निवड़णुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला गळती लागली आहे. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हे देखील वाचा : मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची वर्णी? अमित शाह यांचे सूचक विधान
नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरु केल्यामुळे पक्षातील नेत्यांना घाम फोडला आहे. या राजीनामामुळे नंदूरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
नंदूरबारमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलयांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली असून आरोप केले आहेत. पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याच्या घाट जयंत पाटील यांनी घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी जयंत पाटील पक्षाला संपवण्याचे काम करत आहेत. जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना ताकद देण्याचे काम करत आहे. असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू असंही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.