Chitra Wagh said that there was no attack on NCP Anil Deshmukh elections 2024
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. प्रचार थांबला असला तरी देखील नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाला आहे. काल (दि.18) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. अनिल देशमुख यांचे हल्ले झालेले व रक्तबांबळ झालेले फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर आता भाजप नेत्या व विधान परिषदेच्या चित्रा वाघ यांनी अजब दावा केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
भाजप नेत्या व विधान परिषदेच्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्लाच झालाच नाही असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी लिहिले आहे की, हा फोटो काळजीपूर्वक पाहा.. बोनेटवर दगड आहे. बोनेटला काहीच झालेले नाही. अनिल देशमुख यांनाही कुठली जखम नाही. एक व्यक्ती फोटो काढत आहे, झूम केल्यास तो आरशात दिसेल. मला काहीही म्हणायचे नाही. समझनेवाले समझ गए ! असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला होता. यात त्यांच्या गाडीसमोरील काचावर एक मोठा दगड फेकल्याचा दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या डोक्याला जोरदार मार लागला आहे. डोक्यातून रक्त येताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काचे फुटली आणि त्या काचेचे तुकडे हे समोर बसलेल्या अनिल देशमुखांच्या डोक्याला मागले. घटनेनंतर अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेले आहेत. तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले आहे. या प्रकरणावरुन जोरदार राजकारण रंगले आहे.
हा फोटो काळजीपूर्वक पाहा..
बोनेटवर दगड आहे. बोनेटला काहीच झालेले नाही.
अनिल देशमुख यांनाही कुठली जखम नाही.एक व्यक्ती फोटो काढत आहे, झूम केल्यास तो आरशात दिसेल.
मला काहीही म्हणायचे नाही.
समझनेवाले समझ गए ! pic.twitter.com/W9VcXi9sXu
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 19, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी मरणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही. आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला, त्याला सोडणार नाही. दरम्यान अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.