Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावंतवाडीत दीपक केसरकरांचा विजयी चौकार ; ठाकरे गटाच्या राजन तेलींवर केली मात

सावंतवाडीच्या चौरंगी लढतीमध्ये दीपक केसरकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. ठाकरे गटाच्या राजन तेली यांचा पराभव करत त्यांनी या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 23, 2024 | 03:37 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

सावंतवाडी मतदारसंघाच्या चौरंगी लढतीमध्ये मंत्री दीपक केसरकरांनी तब्बल 39899 मतांनी ठाकरे गटाच्या राजन तेली यांच्यांवर मात केली आहे.दीपक केसरकर यांना 81008 मते मिळाली तर राजन तेलींना 41109 मते मिळाली. सावंतवाडी मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही शिवसेना शिंदे गटाचे दिपक केसरकर विरुद्ध  शिवसेना ठाकरे गटाचे राजन तेली यांच्यात असली तरीही या लढतीमध्ये सर्वात मोठी भूमिका ही अपक्ष उमेदवार विशाल परब आणि अर्चना घारे परब ठरतील असा होरा होता. त्यात विशाल परब यांनी 33281 मते मिळवली मात्र अर्चना घारे परब यांना केवळ 6174 मतांवर समाधान मानावे लागले.

Mahim Election Result 2024: मनसेचं इंजिन ‘यार्डात’ अडकलं? राज – अमित पिता – पुत्राची जादू फेल

चौरंगी लढतीमुळे या मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळत होती. निवडणुक जाहीर होताच राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश करत तेथून उमेदवारी मिळवली. शरद पवार गटामधील अर्चना घारे परब याही अपक्ष उभ्या राहिल्या मात्र दीपक केसरकरांसमोर तेलींसोबत मोठे आव्हान होते ते विशाल परब यांचे, भाजपचे विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यामुळे या मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण झाली होती. विशाल परब यांची मते केसरकरांना विजयापासून रोखू शकतात अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र आज केसरकरांनी दणदणीत विजय मिळवत मतदारसंघावरील पकड कायम असल्याचे दाखवून  दिले.

या विजयामुळे दीपक केसरकर हे सलग चौथ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.  2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पहिल्यांदा विजय मिळवला त्यानंतर शिवसेनेकडून सलग 3 वेळा ते निवडून आले आहेत. 2014 पासून ते राज्यात मंत्री आहेत. 2022 च्या राजकीय उलथापालथीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते महायुती सरकारमध्ये सामील झाले होते.

महायुतीचे वादळ 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत.  आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे.महायुती आतापर्यंत तब्बल 226 जागांवर आघाडी आहे.132 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपचे हे यश विधानसभेतील सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 54 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 40 आघाडी   मिळवली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या निकालानुसार घवघवीत यश संपादन केले आहे. जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोल्सच्या अंदाजांपुढे जात महायुतीने यश मिळवले आहे.

Sangamner Election Result : काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात पराभूत

महाविकास आघाडी नेस्तनाबूत

महायुतीच्या जबरदस्त कामगिरीपुढे महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळत असून केवळ 58 जागांवर आघाडी मिळाली आहे. सध्या कॉंग्रेस 18  जागांवर, शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गट 12 जागांवर आघाडीवर आहे.

 

Web Title: Deepak kesarkars resounding victory over rajan teli in sawantwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Sawantwadi

संबंधित बातम्या

“मराठीच्या नावावरच राज्य केले, तुमचे राजकारणच मराठीच्या नावावर चालते”, दीपक केसरकरांचा नेमका रोख कुणाकडे?
1

“मराठीच्या नावावरच राज्य केले, तुमचे राजकारणच मराठीच्या नावावर चालते”, दीपक केसरकरांचा नेमका रोख कुणाकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.