एकाही नेत्याची आघाडी नाही, अमित ठाकरेच्या पदरीही निराशा (फोटो सौजन्य-X)
Mahim Assembly Election Result 2024 News In Marathi: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरु असून निकालाचे कल देखील समोर आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला काही मतदारसंघामध्ये धक्का बसला आहे.एकंदरित निवडणुकीचा निकाल पाहता महायुती 223 आघाडीवर आहे तर महाविकास 56 जागांवर विजयी आहेत. दुसरीकडे मनसेला सत्ता देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. पण या निवडणुकीत ही राज ठाकरे यांच्या पदरी निराशाच पडण्याची चिन्हे आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत अद्याप एकही उमेदवार विजयी झाला नाही.
23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मनसेचे माहीमधील उमेदवार अमित ठाकरे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. पण त्यानंतर अमित ठाकरे पिछाडीवर गेले. एवढंच नाहीतर वरळी मतदार संघातून संदीप देशपांडेही मागे पडले आहे. तर सर्वात पहिली उमेदवारी जाहीर झालेले बाळा नांदगावकर हे शिवडी मतदासंघातून पिछाडीवर आहे. तर मनसेचे एकमेव आमदार राहिलेले कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे सुद्धा पिछाडीवर आहे. मुंबई वगळता पुणे, संभाजीगर आणि विदर्भातही मनसेची अशीच अवस्था आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं इंजिन पुन्हा यार्डात अडकले. माहीम मतदारसंघात मनसेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी अमित ठाकरे यांचा पराभव झाला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत विजयी झाले आहेत.
भाजपची आतापर्यंतची सर्वात मोठी झेप, 114 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर
महाराष्ट्रातील माहीमच्या जागेवर फक्त शिवसेनाच लढत होती. शिवसेना विरुद्ध ‘उद्धव’ सेना यांच्यातील लढाईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आले. त्यांची स्पर्धा शिवसेनेच्या उद्धव गटाचे महेश सावंत आणि शिंदे शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्याशी होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर हे माहीम मतदारसंघातून विजयी झाले.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार सकाळी 11.30 पर्यंत चार फेऱ्यांचे निकाल जाहीर झाले. त्यात शिवसेनेचे यूबीटीचे महेश सावंत 9694 मतांनी सुमारे 3300 मतांनी पुढे होते. अमित ठाकरे निवडणुकीच्या निकालात तिसऱ्या क्रमाकांवर होते. सकाळी 11.30 वाजेपर्यंत त्यांना केवळ 5000 मते मिळाली.
या जागेवर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मेहनत घेतली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असल्याची चर्चा परिसरातील स्थानिक नेत्यांमध्ये होती. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर प्रचार सभा घेतल्या होत्या. सर्वच सभांमधून त्यांना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर राज ठाकरेंनी एकदाही टीकेची संधी सोडली नाही.
तसेच बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, अविनाश जाधव, राजू पाटील हे निवडून येतील अशी शक्यता होती. पण हे सर्व जण पिछाडीवर आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचार सभांनाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्याचे रुपांतर मतात झालेले दिसत नाही. काही उमदेवारांना तर आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही अशी स्थिती आहे.
माहीममध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेने सर्वाधिक ६ वेळा विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर येथून आमदार झाले. 2014 मध्येही त्यांनी येथून विजय मिळवला होता. शिवसेनेचे बलवान नेते सुरेश गंभीर हे सलग ४ वेळा आमदार झालेले एकमेव नेते आहेत.
यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे प्रथमच धनुष्यबाण चिन्हाशिवाय विधानसभा निवडणूक लढवत आहेत तर शरद पवार हे घड्याळ चिन्हाशिवाय निवडणूक लढवत आहेत. पक्षापक्षांतली लढाई, नेत्यानेत्यंमधली लढाई, नात्यागोत्यातली लढाई या निवडणुकीत सर्वात चर्चात राहिली. खरी शिवसेना कुणाची, खरी राष्ट्रवादी कुणाची, राज्यात सत्ता कुणाची? याचे उत्तर आज मिळणार आहे.
मोठी बातमी! शरद पवार महाविकास आघाडीची साथ सोडणार? भाजप दिग्गज नेत्याचा दावा