Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला…’; नाराज नेत्याची जहरी टीका

विधानसभा निवडणुकीमुळे नाराज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नवीन पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांना देखील नेत्यांची नाराजीला समोरे जावे लागत आहे. गोंदियामध्ये नाराजीमुळे पक्षांतर झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 25, 2024 | 11:46 AM
‘अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला…’; नाराज नेत्याची जहरी टीका
Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : विधानसभा निवड़णुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर करत आहेत. यंदाची विधानसभा ही अत्यंत महत्त्वाची असून प्रतिष्ठेची ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढणार आहेत. युतीमुळे जागावाटपामध्ये अनेकांच्या महत्त्वकांशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे नाराज नेते हे पक्षांतर करुन तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अजित पवार यांच्यावर गोंदियामधील नाराज नेत्यांनी जहरी टीका केली आहे.

गोंदिया अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे अजित पवार गटामध्ये होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलून महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला. त्यामुळे मनोहर चंद्रिकापुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षामध्ये घेत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमाव आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीसांनी भरला उमेदवारी अर्ज; अमृता फडणवीसांकडून औक्षण तर कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवार यांना सोडून तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला असा आरोप आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर करताना चंद्रिकापुरे यांनी बच्चू कडू यांचीसोबत देण्याचा निर्णय घेतला. मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की, “माझ्या मुलाला मी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे आणि त्याच्या पाठीशी उभा असेल.. अजित दादांनी मला अंधारात ठेवून माझा केसाने गळा कापला,” असा घणाघात मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांवर केला.

हे देखील वाचा : झिशान सिद्दिकींचे वडिलांच्या पावलावर पाऊल! आता ठाकरेंना देणार थेट टक्कर

पुढे मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की, “जर दादांनी मला म्हटलं असतं चंद्रिकापुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही. बडोले तुमच्यापेक्षा समोर आहेत तर मीच तिकिट देऊ नका असं म्हटलं असतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसल्याचा जयंत पाटील यांना देखील खूप दुःख झालं.  पण वाटाघाटी झाल्यामुळे आम्ही काहीच करू शकणार नाही, असे ते म्हणाले. आशीर्वाद देणारे हात जर पाठीत खंजीर खुपसणार असतील तर त्या वेदना असह्य होतात. प्रफुल पटेल साहेब जर तुम्हाला आम्हाला मारायचेच होतं तर पाणी प्यायला थोडी उसंत द्यायला पाहिजे होती. किती क्रूरपणे निर्णय घेतला आणि एका निष्पाप माणसाच्या बळी घेतला याचा बदला जनता घेईल.  फितूर आणि विश्वासघाती लोकांना या मतदारसंघातील नागरिक धडा शिकवतील,” अशा कडक शब्दांत मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहे.

 

Web Title: Disgruntled sitting mla of gondia manohar chandrikapure left ajit pawar ncp party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 11:46 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
3

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार
4

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.