Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

अजितदादांच्या निधनानंतर, नटराज नाट्य कला दालनात त्यांच्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते, या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या प्रदर्शनाची मुदत वाढवण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 17, 2026 | 06:30 PM
Ajit Pawar Memorial:

Ajit Pawar Memorial:

Follow Us
Follow Us:
  • बारामतीच्या तिरंगचा चौकात उभारणार अजितदादांचा पुतळा
  • कलकत्त्यात सुरू झाले अजितदादांच्या पुतळ्याचे काम
  • दरवर्षी अजित कला गौरव पुरस्कार देणार
 

Baramati Politics:   शहरातील नटराज नाट्यकला मंडळाच्या वास्तू समोर असलेल्या तिरंगा चौकात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दहा फूट उंचीचा व दीड वजनाचा पूर्ण कृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना किरण गुजर म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर अद्यापही बारामतीकर दुःखातून बाहेर आलेले नाहीत. या कार्यकर्तृत्वान नेत्याला बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्र कदापिही विसरू शकणार नाही. अजितदादा यांच्या संकल्पनेतूनच बारामती शहरातील हे नटराज नाट्य कला मंडळाचे कलादालन उभारण्यात आले आहे. त्यांच्या सूचनेनुसारच या ठिकाणी ३० मीटर उंचीचा तिरंगा राष्ट्रध्वज उभारून या चौकाला तिरंगा चौक हे नाव देण्यात आले आहे.

बारामती पंचायत समितीचा सभापती कोण होणार? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

अजितदादांनी कलावंतांवर नेहमीच प्रेम केले आहे. त्यामुळे कलावंत त्यांना कदापिही विसरू शकणार नाहीत, त्यांच्या कार्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी, या दृष्टिकोनातून तिरंगा चौकात नटराज मूर्तीच्या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दहा फूट उंची व पाच फूट चौथरा असा दीड ते दोन टन वजनाचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने घेतला आहे. त्यानुसार कलकत्ता या ठिकाणी या पूर्णकृती पुतळ्याचे काम सुरू केले आहे. या पुतळ्याचे छायाचित्र आमच्याकडे आल्यानंतर, आम्ही याबाबत बारामतीतील अनेकांना हे छायाचित्र पाठवून, त्यांच्याकडून काही सूचना मागून योग्य त्या दुरुस्ती केल्या जाणार आहेत. कलकत्ता येथील शेख हे कलाकार यापूर्णाकृती पुतळ्याचे काम करत आहेत. या पुतळ्याच्या कास्टिंगचे काम  उरळी कांचन येथील कलावंत रूपेश उघडे हे पहाणार आहेत. (Baramati Politics)

दरवर्षी अजित कला गौरव पुरस्कार देणार

या पुतळ्यासाठी लागणाऱ्या संबंधित विभागाच्या मान्यता घेण्याचे काम सध्या सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो, त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही नटराज कलादालनात “अजित कला महोत्सव”हा तीन दिवसांचा आयोजित करणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला सादर केल्या जाणार आहेत, यातील दरवर्षी एका कलावंतास “अजित कला गौरव”या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे …

कलादालनास नामकरण करण्याचा निर्णय

दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर, नटराज नाट्य कला दालनात त्यांच्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते, या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या प्रदर्शनाची मुदत वाढवण्यात आली आहे. या कलादालनाच्या पहिल्या मजल्यावर, कायमस्वरूपी अजितदादांचे छायाचित्र प्रदर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, या दुसऱ्या मजल्या वरील कलादालनास”अजित कला दालन”हे नामकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून श्रीकांत अनपट हे या कलादालनाचे डिझाईन तयार करत आहेत. उरळीकांचन येथील रुपेश उघडे यांनी सिलिकॉनचा अजितदादांचा अर्ध पुतळा तयार केला आहे, या पुतळ्याचे चेहऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. हा पुतळा देखील नटराज कला दालनात कायमस्वरूपी ठेवण्यात येणार असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.

 

Web Title: Ajit pawar memorial a historic statue of ajit pawar will be erected at tiranga chowk in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी
1

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी

KARJAT : रायगडात राष्ट्रवादीला धक्का! अंकित साखरे यांच्या भावासह पत्नीचा शिवसेनेत प्रवेश
2

KARJAT : रायगडात राष्ट्रवादीला धक्का! अंकित साखरे यांच्या भावासह पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

‘तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?’ अमित साटम वादावरून राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र; ‘लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांवर कारवाई करा’
3

‘तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?’ अमित साटम वादावरून राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र; ‘लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांवर कारवाई करा’

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड पडले,  झाड पडल्याने हॉटेलकडे जाणारा रस्ता बंद
4

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड पडले, झाड पडल्याने हॉटेलकडे जाणारा रस्ता बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.