Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी पार्थ पवार, सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 06:35 PM
Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी
Follow Us
Follow Us:

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला 
पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी 
सुनील तटकरे यांनी साधला माध्यमंशी संवाद

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशीची मागणी केली जात आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी पार्थ पवार, सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याचे समजते आहे. ही भेट कशासाठी घेतली गेली याचे कारण आता समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. त्याबाबत त्यांना एक निवेदन देण्यात आले आहे.

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपघातासंदरर्भात विमान अपघात ब्यरोकडून पहिल्यांदाच महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डवर आगीचा दुष्परिणाम झाल्यामुळे रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळही माजली असून पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

विमान अपघात तपास ब्युरोकडून  जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, विमान कोसळल्यामुळे विमानाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अजित पवार यांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे या रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाले आहे.  त्यातही L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात  ब्युरो यशस्वी झाली . कॉकपीट व्हॉईस  रेकॉर्डरचा डेटा रिकव्हर कऱण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. हे रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून  संबंधित देशातील प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली आहे. तर्कवितर्क  लावण्याऐवजी  तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन तपास ब्युरोकडून देण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅडर्डनुसार तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स ही त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे साहित्य मानले जाते.   ब्लॅक बॉक्स हे रेकॉर्डिंग डिव्हाईस असून. त्यात विमान उड्डाणादरम्यान, कॉकपीटमध्ये झालेल्या संभाषणाची आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केला जातो.

Web Title: Dcm sunetra pawar meet cm fadnavis and demand ajit pawar plane crash cbi enquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CBI
  • CM Devendra Fadnavis
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
1

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
2

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
3

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.