Election commission and police raid in Vikhroli mumbai
विक्रोळी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सध्या प्रचाराचा धुराळा उडाला असून सभा आणि बैठका वाढल्या आहेत. मागील महिन्यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. तेव्हापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राज्यामध्ये सरकार स्थापन केले जाणार आहे. पण त्यापूर्वी विक्रोळीमध्ये मोठा छापा मारण्यात आला आहे. आचारसंहितेच्या काळात राज्यभरात पैशांचा पाऊस पडू लागला आहे.. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत आतापर्यंत कोट्यवधींचं घबाड जप्त केले आहे. आता पुन्हा एकदा विक्रोळीमध्ये मोठं गबाड पथकाच्या हाती लागले आहे.
निवडणूक आयोग राज्यभरामध्ये करडी नजर ठेवून आहे. मुंबई, पुणे, सोलापूर असो अथवा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणी कोट्यवधी रुपयांवर छापा मारण्यात आला आहे. सोने, चांदी आणि पैशांचे बंडल मिळत आहेत. आता पुन्हा एकदा विक्रोळीमध्ये मोठं घबाड जप्त केले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने एक कॅश व्हॅन पकडली होती. आज पुन्हा विक्रोळीत मोठा खजिना निवडणूक आयोगाच्या हाती लागला आहे. एका कॅन व्हॅनमध्ये साडेसव्वा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत.
विक्रोळीमध्ये निवडणूक आयोगाने छापेमारी केली आहे. यामध्ये गाडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या छाप्यामध्ये सापडलेल्या चांदीच्या विटांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी घेऊन जात होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
हे देखील वाचा : या सर्वांना पाडून टाका…; मनोज जरांगे पाटलांचे नेमके मराठा समाजाला सांगणे तरी काय?
इतर ठिकाणी रोकड अन् सोनं जप्त
निवडणुकीच्या तोंडावर पैसे, सोने आणि चांदी सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आणि पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तसेच विविध ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. पुण्यातही काही दिवसांपूर्वी सोने जप्त करण्यात आले होते. मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर प्लाझाजवळ पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त करण्यात केली होती. चालकासह कारमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर मुंबईत यापूर्वी देखील अशाच पद्धतीने रोकड जप्त करण्यात आली होती. मुंबईतील भुलेश्वरमध्ये देखील 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होते. त्यानंतर आता विक्रोळीमध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.