फोटो - सोशल मीडिया
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. सत्ताधारी महायुतीकडून आत्तापर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येत आहे. तसेच पुन्हा एकदा सत्ता आली तर कोणती विकासकामे केली जातील याची माहिती देण्यात येत आहे. भाजप, अजित पवार गट, कॉंग्रेस व उद्धव ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आश्वसानांचा पाऊस या जाहीरनाम्यांमधून पडतो आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर मतदारांचा जाहीरनामा तुफान व्हायरल होत आहे. यामधून मतदारांच्या आणि सामान्य लोकांच्या अपेक्षा सांगितल्या जात आहेत.
काय आहेत मतदारांच्या मागण्या?
हे देखील वाचा : या सर्वांना पाडून टाका…; मनोज जरांगे पाटलांचे नेमके मराठा समाजाला सांगणे तरी काय?
हे देखील वाचा : “बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान
एक मतदार म्हणून आम्हाला आपल्याकडून याच अपेक्षा आहेत. बारसे, वाढदिवस, लग्न समारंभ, उदघाटन, मैत, दहावे, तेरावे यातील आपल्या उपस्थिती पेक्षा आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली उपस्थिती आणि कार्यवरील कामांमध्ये अपेक्षित आहे. किंबहुना आपण हेच कार्य करणे साठी आपला बहुमूल्य वेळ द्यावा हि मतदाराचीसुद्धा अपेक्षा आहे. आम्हाला नुसताच चमकणारा लोकप्रतिनिधी नको असून मतदारांचे दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी चमकणारा लोकप्रतिनिधी हवा आहे याची सर्व भावी लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यावी हि विनंती, असे थेट मतदारांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिण्यात आले आहे.