Shivaji Park on the last day of assembly election campaigning
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे जोरदार राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये आता सभांचे आणि भाषणांचे सत्र वाढणार आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यामध्ये होणार असल्यामुळे सर्व नेत्यांची प्रचारासाठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार सभांचा आणि घोषणांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय अनेक भाषणांचा साक्षीदार हे शिवाजी पार्क आहे. अनेक नेत्यांची तडफदार भाषण या मंचावरुन झाली आहे. शिवाजी पार्कवर लाखो कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची गर्दी पाहिली आहे. या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर शेवटच्या दिवशी प्रचार सभा घेण्यासाठी सर्व नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेवटच्या एका दिवसासाठी आणि एकाच वेळेसाठी शिवाजी पार्कसाठी चार प्रमुख नेत्यांनी मागणी केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, मनसे आणि भाजप अशा चारही पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत.
राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजले असून एकाच टप्प्यामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या प्रचाराची सांगता एकाच वेळी होणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस हा 17 सप्टेंबर असून या दिवशी रविवार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांचा मतदारांपर्यंत पोहचण्याचा शेवटचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. यामुळे शिवाजी पार्कवर सभा घेण्याचा प्रमुख पक्षांचा मानस आहे. यामुळे सर्व प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या मैदानासाठी सर्वात पहिल्यांदा अर्ज मनसेकडून आला आहे. त्यामुळे मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
हे देखील वाचा : आपला सुद्धा एनकाउंटर होऊ शकतो याची काळजी घ्या…; संजय शिरसाट नेमकं म्हणाले कोणाला?
याबाबत मैदान मनसेला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत यशवंत किल्लेदार म्हणाले की, “येत्या १८ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावत आहेत. त्यामुळे १७ नोव्हेंबरला संध्याकाळी सभा घेण्यासाठी आम्ही शिवाजी पार्क मैदान आरक्षित करण्यासाठी अर्ज दिला आहे. या दिवसासाठी आणखी तीन पक्षांनी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. यावेळी प्रथम अर्ज देणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते आणि आमचा अर्ज सर्वात प्रथम देण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आमचा अर्ज पहिला आलेला आहे. या मैदानाला राजकीय वारसा बाळासाहेबांमुळे तयार झाला आहे, तो मान्य करावा लागेल. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेचा इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रावर पडतो,” असे मत यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केले आहे.