बच्चू कडू यांच्या एन्काऊंटरच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकीमुळे बैठका, जागावाटप आणि चर्चा यांचे सत्र वाढले आहे. दोन दिवसांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट माध्यमांशी संवाद साधत संजय शिरसाट म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीसाठी यादी लवकर जाहीर करणे गरजेचे आहे. युतीमध्ये सर्व जागा जवळपास ठरल्यात जमा आहेत. महायुतीचे नेते कदाचित आज दिल्लीला जातील यादी फायनल होईल. प्रत्येक पक्ष दोन टप्प्यात यादी जाहीर करणार आहे. भाजपची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल आणि नंतर शिवसेनेची यादी जाहीर होईल त्याच पद्धतीने राष्ट्रवादीची यादी जाहीर होईल. महायुतीत जागेमध्ये तिढा राहिलेला नाही. महायुतीचे रिपोर्ट कार्ड दिले आहे, आठ दिवसानंतर सगळ्यांचे दौरे ठरले आहेत, जबाबदारी वाटून दिल्या आहेत. आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत,” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी महायुती विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. लवकरच निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा जरांगे पाटलांचा इशारा आहे. मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील म्हणाले की, “आमचा राग शमविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या मित्रपक्ष बरोबर काही वाद असेल तर त्यावर तोडगा काढू. मंत्री तानाजी सावंत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे,” असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : विधानसभेसाठी मनसे ॲक्शन मोडवर!अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?
बच्चू कडू यांनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी गौप्यस्फोट करणार असून एन्काऊंटर करणार असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “त्यांच्या जागा जाहीर होऊ दे. ते स्फोट करतायत ते करु द्या त्यानंतर त्यांची ताकद कळेल. ते आता एन्काऊंटर करू लागलेत, कधीकाळी आपला सुद्धा एनकाउंटर होऊ शकतो याची काळजी घ्यायला हवी,” असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.
ठाकरे गटामध्ये व शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश वाढले आहेत. अनेक नेते महाविकास आघाडीमध्ये सामील होत आहेत. यावरुन उत्तर देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, “जाणारे हे माई का लाल नाही, सगळे तिकीट मिळविण्यासाठी तेथे जात आहेत. सगळा कचरा उबाठाकडे जात आहे की काय असे वाटते त्यांच्याबरोबर कार्यकर्ते जाणार नाहीत. जाणाऱ्यांची यादी पाहिली तर यांना त्यांच्या पक्षांनी नाकारले आहे त्यांना तिकिटे नाकारलेली आहे, फक्त तिकीट साठी जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर असे होत असते,” अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

हे देखील वाचा : सोशल मीडियावर फिरतीये कॉंग्रेस उमेदवारांची फेक यादी; ऑफिशियल अकाऊंटवरुन दिली माहिती