Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

J&K Election Results 2024 LIVE : जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स अन् कॉंग्रेस करणार सत्तास्थापन; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर

Jammu-Kashmir Election Results 2024: केंद्रशासित प्रदेश घोषित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. घाटीत 10 वर्षांनंतर निवडणुका झाल्या, त्यात 63.45 टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीर निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून, सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 08, 2024 | 04:02 PM
Jammu-Kashmir election result 2024 live update result full list

Jammu-Kashmir election result 2024 live update result full list

Follow Us
Close
Follow Us:

Jammu-Kashmir Election Results 2024 In Marathi: केंद्रशासित प्रदेश घोषित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची ही पहिलीच वेळ आहे. घाटीत 10 वर्षांनंतर निवडणुका झाल्या, त्यात 63.45 टक्के मतदान झाले. मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार भाजप आणि एनसी-काँग्रेस आघाडी आहेत.तर पीडीपी आणि अवामी इत्तेहाद पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. एक्झिट पोल त्रिशंकू विधानसभेकडे निर्देश करतात, ज्यामध्ये कोणत्याही पक्षाचे वर्चस्व दिसत नाही. अशा स्थितीत नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी युतीचे राजकारण सुरू केले असून ते पीडीपीला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालांचे सर्व ताजे अपडेट्स येथे वाचा…

The liveblog has ended.
  • 08 Oct 2024 03:10 PM (IST)

    08 Oct 2024 03:10 PM (IST)

    ओमर अब्दुल्ला यांनी विजयानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

    जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणला आहे. राष्ट्रीय पक्षांना टक्कर देत स्थानिक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने 29 जागांवर विजय तर 12 जागांवर आघाडी घेतली आहे. यानंतर कॉंग्रेससोबत आपली युती देखील नॅशनल कॉन्फरन्सने जाहीर करत सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. यानंतर आता ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "मी संपूर्ण काश्मीरबद्दल नाही तर आत्ता माझ्या मतदारसंघाबद्दल बोलतो. माझ्या बडगाम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे भरघोस मतदान केल्याबद्दल आणि मला पुढे पाठवल्याबद्दल धन्यवाद मानतो. आमच्या पक्षाला गेली 5 वर्षे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. काही लोक स्वतः मैदानात आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आले होते. आता मात्र आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. या मतांसाठी स्वतःला पात्र सिद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे..." अशा भावना ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या.

  • 08 Oct 2024 02:19 PM (IST)

    08 Oct 2024 02:19 PM (IST)

    ओमर अब्दुल्ला विजयी; घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

    जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स - जेकेएनला 8 जागी विजय मिळाला असून 33 जागांवर आघाडी आहे. तर कॉंग्रेसचा 2 जागी विजय झाला असून 4 जागांवर आघाडी आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. बडगाम (२७) या मतदार संघातून ओमर अब्दुल्ला यांचा विजय झाला आहे. 13 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर 18 हजार मतांच्या फरकाने ओमर अब्दुल्ला विजयी झाले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी कॉंग्रेससोबतची युती करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.

  • 08 Oct 2024 02:03 PM (IST)

    08 Oct 2024 02:03 PM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स अन् कॉंग्रेस करणार सत्ता स्थापन

    जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यानंतर भाजपला धक्का बसला आहे. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस पक्ष जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत. काश्मीरमध्ये भाजपला जनतेनं नाकारलं आहे. नॅशनल कॉन्फरन्सनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला असून मिठाई वाटली जात आहे. ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • 08 Oct 2024 01:35 PM (IST)

    08 Oct 2024 01:35 PM (IST)

    नऊ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची घोषणा

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झाली आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासून नॅशनल कॉन्फरन्स पक्ष अनेक मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत. आता निवडणूक आयोगाकडून जम्मू काश्मीरमधील पहिल्या नऊ विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप पक्षामध्ये लढत सुरु आहे.  नॅशनल कॉन्फरन्सने तीन जागांवर विजय मिळवला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे गुरेजमधील उमेदवार नझीर अहमद खान, हजरतबल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सलमान सागर आणि झाडीबलमधील उमेदवार तन्वीर सादिक यांनी विजयश्री खेचून आणला आहे. तर जम्मू काश्मीरमधील भाजपचे पाच उमेदवार विजयी म्हणून घोषित झाले आहेत.  भाजपाने चेनानी विधानसभेचे उमेदवार बळवंत सिंह मनकोटिया, उधमपूर पूर्वचे उमेदवार रणबीर सिंग पठानिया, बिल्लावरचे भाजप नेते सतीश कुमार शर्मा, बासोहलीचे दर्शन कुमार, जम्मू उत्तर शाम लाल शर्मा तर जम्मू पश्चिममधून अरविंद गुप्ता या सहा मतदारसंघात  भाजपने विजय मिळवला आहे.

  • 08 Oct 2024 12:43 PM (IST)

    08 Oct 2024 12:43 PM (IST)

    भाजपचा आणखी एक दणदणीत विजय; सांबा मतदारसंघ पटकावला

    जम्मू काश्मीर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी 8 पासून मतमोजणी सुरु असून यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारल्याचे चित्र होतं. निवडणूक आयोगाकडून सर्व फेऱ्यांमधील मतदान मोजून आता निकाल जाहीर केले जात आहेत. भाजपने सांबा मतदारसंघावर विजय मिळवला आहे. 70 - सांबा या मतदारसंघामध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तब्बल 42 हजारहून अधिक मत मिळवून भाजप उमेदवार सुरजीत सिंग सलाठिया हे विजयाकडे कूच करत आहेत. विशेष म्हणजे रविंद्र सिंग या अपक्ष उमेदवाराने सांबामध्ये जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही उमेदवारांमध्ये 29 हजारहून अधिक मतांचा फरक असल्यामुळे हे गाठणे आता अपक्ष उमेदवाराला शक्य नाही. त्यामुळे सांबा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या पदरामध्ये पडला आहे.

  • 08 Oct 2024 12:35 PM (IST)

    08 Oct 2024 12:35 PM (IST)

    नॅशनल कॉन्फरन्सने गुरेझ विधानसभेची जागा जिंकली

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपासून नॅशनल कॉन्फरन्सने मुसंडी मारली आहे. आता जम्मू काश्मीरमधील दुसरा विजयी  उमेदवार जाहीर झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने गुरेझ विधानसभा मतदारसंघावर बाजी मारली आहे.  नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नझीर अहमद खान यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. केवळ एक हजार मतांनी त्यांनी हा विजय मिळवला असून भाजपचे उमेदवार फकीर मोहम्मद खान यांचा त्यांनी पराभव केला आहे. फकीर मोहम्मद खान यांना 7 हजारहून अधिक मत मिळाली आहेत.

  • 08 Oct 2024 12:30 PM (IST)

    08 Oct 2024 12:30 PM (IST)

    जम्मू काश्मीरचा पहिला उमेदवार विजयी

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पहिल्या विजयी उमेदवाराचे नाव समोर आले आहे.बसोली मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे.  जारी केलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार दर्शन कुमार यांनी बसोली जागेवर विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या लालसिंग यांचा 16,034 मतांनी पराभव केला. या मतदारसंघामध्ये 246 नोटाला मत पडली होती.

  • 08 Oct 2024 12:22 PM (IST)

    08 Oct 2024 12:22 PM (IST)

    मेहबुबा मुफ्तींची मुलगी पिछाडीवर; इल्तिजा मुफ्ती हजारो मतांनी मागे

    जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या सर्वेसर्वो मेहबुबा मुफ्ती यांना मोठा फटका बसला आहे. मेहबुबा मुफ्तीं यांची कन्या इल्तिजा मुफ्ती या पिछाडीवर आल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षातून इल्तिजा मुफ्ती या निवडणूक लढवत होत्या. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे बशीर अहमद शाह वीरी यांनी इल्तिजा मुफ्ती यांना जोरदार लढत देत आघाडी घेतली आहे. 27 हजार मतं पडून बशीर अहमद शाह वीरी हे आघाडीवर असून सात हजार मतांनी इल्तिजा मुफ्ती मागे आहेत.“मला जनतेचा निर्णय मान्य आहे. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी सदैव माझ्यासोबत राहील. माझ्या पीडीपी कार्यकर्त्यांचे आभार ज्यांनी या मोहिमेमध्ये खूप मेहनत घेतली, अशा भावना इल्तिजा मुफ्ती यांनी व्यक्त केल्या आहेत.

    I accept the verdict of the people. The love & affection I received from everyone in Bijbehara will always stay with me. Gratitude to my PDP workers who worked so hard throughout this campaign 💚

    — Iltija Mufti (@IltijaMufti_) October 8, 2024

  • 08 Oct 2024 12:08 PM (IST)

    08 Oct 2024 12:08 PM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पिछाडीवर

    जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कलम 370 हटवल्यानंतर आणि जोरदार प्रचार केल्यानंतर भाजपला काश्मीरमध्ये यशाची अपेक्षा आहे. मात्र सध्या समोर आलेल्या कलांनुसार भाजपच्या इच्छेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. भाजपचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष देखील पिछाडीवर आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 84 - नौशेरा या मतदारसंघामध्ये रविंद्र रैना यांना धक्का बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना हे तब्बल 11 हजार मतांनी मागे आहेत. नौशेरा मतदारसंघामध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने भाजपला धक्का दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सुरिंद्र कुमार चौधरी हे आघाडीवर असून 27 हजारहून अधिक मतं त्यांना मिळली आहेत.

  • 08 Oct 2024 11:04 AM (IST)

    08 Oct 2024 11:04 AM (IST)

    एका दशकानंतर लोकशाहीचा उत्सव; तरीही जम्मू काश्मीरमध्ये 'एवढी' नोटाला मतं

    कलम 370 हटवल्यानंतर आणि एका दशकानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. जम्मू काश्मीरमधील लोकांनी भाजप व कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांपेक्षा स्थानिक पक्षांना कौल दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाची आघाडी आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची सध्या 39 जागांवर आघाडी आहे.  काश्मीरमधील अनेक लोकांनी 'नोटा'ला मतदान केलं आहे.

    काश्मीरमधील या मतदारसंघातील 'नोटा'च्या मतदानाची आकडेवारी

    1. अखनूर (SC) – 259 नोटा
    2. अनंतनाग – 458 नोटा
    3. अनंतनाग पश्चिम – 644 नोटा
    4. बाहु – 153 नोटा
    5. पुलवामा – 480 नोटा
    6. उरी - 706 नोटा
    7. बांदीपोरा – 105 नोटा
    8. बानी – 176 नोटा
    9. बनिहल – 576
    10. बारामुल्ला – 215 नोटा
    11. बसोहली – 225 नोटा
    12. बिरवाह- 698 नोटा
    13. बिल्लावार – 311 नोटा
    14. झाडीबाल -  296 नोटा
  • 08 Oct 2024 10:38 AM (IST)

    08 Oct 2024 10:38 AM (IST)

    निकालाआधीच युतीची तयारी; जम्मू काश्मीरमध्ये जोरदार राजकारण

    जम्मू काश्मीरमध्ये तब्बल एका दशहकानंतर विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगला आहे. यामध्ये भाजप व कॉंग्रेस पक्षाने जोरदार तयारी करत प्रचाराचा धुराळा उडवला होता. मात्र लोकांनी स्थानिक पक्षांच्या बाजूने कौल दिला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. जम्मू काश्मीरचे कल समोर येत असून यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मात्र निकालापूर्वीच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी युतीची तयारी सुरु केली आहे. भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षासोबत युतीचे संकेत फारूक अब्दुल्ला यांनी दिले आहेत. तुम्हाला पीडीपी पक्षासोबत युती करायला आवडेल का? असे माध्यमांनी विचारल्यावर फारूक अब्दुल्ला म्हणाले की, “का नाही? काय फरक पडतो? मला खात्री आहे की काँग्रेसचाही यावर आक्षेप नसेल. आम्ही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी यामध्ये काही अडचण येण्याचं कारण नाही" असे मत फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे निकालापूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे.

  • 08 Oct 2024 10:05 AM (IST)

    08 Oct 2024 10:05 AM (IST)

    निवडणूक आयोगने सांगितली जम्मू काश्मीरमधील आकडेवारी

    जम्मू काश्मीरमधील आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कॉंग्रेसला मोठा फटका बसला असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स अर्थात जेकेएन हा काश्मीरमध्ये सर्वात पुढे आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची 90 पैकी एकूण 40 जागांवर आघाडी आहे. तर त्यानंतर भाजपने देखील जोरदार टक्कर दिली आहे. 22 जागांवर भाजप आघाडीवर असून कॉंग्रेस फक्त 8 जागांवर आघाडीवर आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्ष 3 जागांवर तर जम्मू आणि काश्मीर पीपल कॉन्फरन्स – JPC हा देखील 3 जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्ष आणि इतर 9 उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या आकडेवारीमध्ये भाजप आणि कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे.

  • 08 Oct 2024 09:45 AM (IST)

    08 Oct 2024 09:45 AM (IST)

    जम्मू आणि काश्मीर निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये ‘हे’ नेते आघाडीवर

    1. नगरोटा- देवेंद्रसिंग राणा (भाजप)
    2. उधमपूर पूर्व - रणवीर सिंग पठानिया (भाजप)
    3. पूँछ हवेली - एजाज अहमद जान (JKNC)
    4. खानसाहेब - सैफ उद दिन भट (JKNC)
    5. जम्मू उत्तर - शाम लाल शर्मा (भाजप)
  • 08 Oct 2024 09:38 AM (IST)

    08 Oct 2024 09:38 AM (IST)

    लोकांचा कौल विरोधात असेल तर भाजपाने जुगाड करायला नको - ओमर अब्दुल्ला

    जम्मू काश्मीरमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये फारुख अब्दुल्लाह यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्ष सरस ठरताना दिसत आहे. सकाळपासून नॅशनल कॉन्फरन्सने भाजपला मोठी टक्कर दिली आहे. सध्या त्यांच्या पक्षाची 36 जागांवर आघाडी आहे.  त्यांनतर आता  नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विजयचा विश्वास व्यक्त करत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करावी असे मत मांडले आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये आमचाच विजयी होईल अशी खात्री वाटते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी जे ठरवले आहे, ते दुपारपर्यंत पूर्णपण कळेलच. पण निकालात पारदर्शकता असायला हवी. जमुरीयतमध्ये जे काही होईल, ते पारदर्शक पद्धतीने व्हायला हवे. जनतेचा कौल स्वीकारला गेला पाहीजे. जर लोकांचा कौल भाजपाच्या विरोधात असेल तर त्यांनी जुगाड वैगरे केला नाही पाहीजे. राजभवनने कोणताही हस्तक्षेप न करता लोकांचा कौल स्वीकारावा.” असे मत ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.

  • 08 Oct 2024 09:29 AM (IST)

    08 Oct 2024 09:29 AM (IST)

    फारुख अब्दुल्लाह ठरतायेत किंगमेकर! राष्ट्रीय पक्षांना दिली जोरदार टक्कर

    जम्मू व काश्मीरमधील सर्व जागांचा कल हाती आला आहे. 90 जागांपैकी एकाही पक्षाकडे पूर्णपणे बहुमत दिसत नसले तरी देखील फारुख अब्दुल्लाह यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. प्रचार काळामध्ये भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने प्रचारा धुराळा उडवला होता. मात्र लोकांचा कल हा स्थानिक पक्षाकडे अधिक असलेला दिसून येत आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष व पीडीपी पक्ष हे काश्मीरच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहे. सध्या भाजपची 23 जागांवर आघाडी तर 18 जागांवर कॉंग्रेसची आघाडी दिसून येत आहे. मात्र सर्वात पुढे फारुख अब्दुल्लाह यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आहे. त्यांच्याकडे 36 जागांवर आघाडी आहे.

  • 08 Oct 2024 09:12 AM (IST)

    08 Oct 2024 09:12 AM (IST)

    भाजप - कॉंग्रेस नाही तर नॅशनल कॉन्फरन्सने मारली मुसंडी

    जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 जागांवर विधानसभा निवडणूक पार पडली. आता आज निकाल लागणार असून सर्व जागांचे कल हाती आले आहे. काश्मीरमध्ये प्रचारावेळी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार रंगत लढली होती. आता मात्र निकालामध्ये हे दोन्ही पक्ष मागे पडलेले दिसत आहे. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. 90 जागांवरील सर्व जागांचे कल समोर आले आहेत. यामध्ये नॅशनल कॉंन्फरन्स 31 जागांवर सर्वांत पुढे आहे. त्यानंतर भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप जम्मू व काश्मीरमध्ये 28 जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर कॉंग्रेस असून कॉंग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर पीडीपी 5 जागांवर तर इतर लहान पक्ष हे 12 जागांवर आघाडीवर दिसत आहेत.

  • 08 Oct 2024 08:59 AM (IST)

    08 Oct 2024 08:59 AM (IST)

    विजयश्री कॉंग्रेस खेचून आणणारा; जम्मू काश्मीरमधील उमेदवाराचा विजय

    निवडणूकीला जम्मू काश्मीरमधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सध्या काश्मीरमध्ये भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये चुरशीची लढाई सुरु आहे. कॉंग्रेसकडून देखील विजयाचा विश्वास व्यक्त केला जातो आहे. राजौरी येथील काँग्रेसचे उमेदवार इफ्तिखार अहमद यांनी विजयश्री कॉंग्रेस खेचून आणणारा असा विश्वास केला. ते म्हणाले,"लोकशाहीच्या या सणात लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. 10 वर्षांनी निवडणुका झाल्या, लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हा निकालाचा दिवस आहे. माझ्या शुभेच्छा. मला आशा आहे की लोकांच्या जनादेशाचा आदर केला जाईल आणि लोकशाहीचा विजय होईल. असा विश्वास कॉंग्रेस उमेदवारांने व्यक्त केला आहे.

  • 08 Oct 2024 08:42 AM (IST)

    08 Oct 2024 08:42 AM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये भाजप आघाडीवर; नॅशनल कॉन्फरन्सकडून अटीतटीची लढत

    जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. जम्मू काश्मीरमधील लोकांनी भाजपला साथ दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या तरी भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी देखील काश्मीरमध्ये सध्या भाजप आघाडी घेताना देताना दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना होत आहे. भाजपने 27 जागांवर आघाडी घेतली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सने 31 जागांवर आघाडी घेतली आहे. पीडीपी 4 जागांवर आघाडीवर असून इतर लहान पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहे.

  • 08 Oct 2024 08:29 AM (IST)

    08 Oct 2024 08:29 AM (IST)

    भाजपने व्यक्त केला विजयाचा विश्वास

    जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली असून मतदानापूर्वी भाजपने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते कविंदर गुप्ता म्हणाले, “भाजपने जम्मू-काश्मीरच्या जनतेला विकासाच्या मार्गावर नेले आहे आणि दगडफेकीपासून मुक्त केले आहे. फुटीरतावाद, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणातून त्यांची मुक्तता झाली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही बुलेटकडून मतपत्रिकेकडे, दहशतवादापासून पर्यटनाकडे गेलो, लोकांनी भाजपला मतदान केले आणि तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. एक्झिट पोलचा निकाल काहीही असला तरी आम्ही लोकांमध्ये होतो. आम्हाला लोकांचा कौल माहीत आहे. निकाल भाजपच्या बाजूने लागतील” असा विजयाचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

  • 08 Oct 2024 08:20 AM (IST)

    08 Oct 2024 08:20 AM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त

    जम्मू काश्मीरमध्ये अवघ्या काही वेळामध्ये मतमोजणी सुरु होणार आहे. मोदी सरकारने 370 कलम हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे देशभराचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यामध्ये 90 जागांवर निवडणूक पार पडली. यानंतर आता मजमोजणी सुरु होणार आहे. यामुळे मतकेंद्राच्या बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक देखील तीन टप्प्यांमध्ये पार पडली. त्यानंतर आता चोख बंदोबस्तामध्ये  मतमोजणी पार पडत आहे. मतमोजणीपूर्वी श्रीनगर, हंदवाडा, कुपवाडा येथील मतमोजणी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक उपाययोजनांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मतमोजणी केंद्रांच्या सभागृहात केवळ उमेदवारांनी निश्चित केलेले एजंटच जाऊ शकतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना परवानगी दिली जाईल.

Web Title: Jammu and kashmir vidhansabha election results 2024 live 90 seats see full list of winners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 06:27 AM

Topics:  

  • Election Comission
  • Election Result 2024
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता
1

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता
2

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी
3

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी

सहा वर्षांपासून देशाचा मुकूट फक्त केंद्र शासित प्रदेश; जम्मू काश्मीरला कधी मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा
4

सहा वर्षांपासून देशाचा मुकूट फक्त केंद्र शासित प्रदेश; जम्मू काश्मीरला कधी मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.