कर्तव्यावर असलेल्या CRPF जवानाला लागली गोळी (फोटो सौजन्य-X)
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (13 नोव्हेंबर) मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 43 जागांवर सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. एकूण 2.60 कोटी मतदारांपैकी 1.37 कोटी मतदार या प्रक्रियेमध्ये मतदान करणार आहेत.मात्र याच विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. लातेहारमध्ये निवडणूक ड्युटी करत असलेल्या सीआरपीएफ जवानावर गोळी झाडण्यात आली. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
लातेहारमध्ये निवडणुकीच्या कर्तव्यावर तैनात असणारे सीआरपी संतोष यादव यांच्या डोक्याला गोळी लागण्याची घटना घडली आहे.शिपाई लातेहारच्या लभर पिकेटमध्ये तैनात होते. गोळी लागल्याने जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मेदिनीराय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (13 नोव्हेंबर) सकाळी लातेहारच्या लभर पिकेटमध्ये आकस्मिक गोळीबार झाला. ज्यामध्ये संतोष कुमार यादव यांच्या डोक्यात गोळी लागली. ठिकठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना तत्काळ मेदिनीराय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पलामू रेंजचे डीआयजी वायएस रमेश, सीआरपीएफचे डीआयजी पंकज कुमार, पलामूचे एसपी रिश्मा रामसन आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले आणि जवानाची प्रकृती जाणून घेतली.
हे सुद्धा वाचा: माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला
जवान संतोष यादव यांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. जखमी जवान संतोष कुमार यादव हे बिहारचा रहिवासी आहे. पलामूचे डीआयजी वायएस रमेश म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी लाभरमध्ये सीआरपीएफ तैनात करण्यात आले होते. अपघाती गोळीबाराची घटना घडली असून त्यात एका CRPF जवानाला गोळी लागली आहे. या जवानाला एअरलिफ्ट करून रांचीला पाठवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज ४३ जागांवर मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ तारखेला लागणार आहे.
हे सुद्धा वाचा: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; 683 उमेदवारांचे भवितव्य पणाला