
Pulwama Terror Attack 2019: १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला आता काही वर्षे उलटली असली तरी, आजही या घटनेशी संबंधित काही प्रश्न लष्करी तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि सामान्य नागरिकांच्या मनात कायम आहेत. २०१९ मध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका आत्मघातकी हल्लेखोराने २,५०० हून अधिक सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ७८ वाहनांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. पुलवामा हल्ल्यात कर्तव्यावर असलेले चाळीस केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) जवान शहीद झाले. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला आता काही वर्षे उलटली असली तरी, आजही या घटनेशी संबंधित काही प्रश्न लष्करी तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि सामान्य नागरिकांच्या मनात कायम आहेत. या प्रश्नांवरून अनेकदा चर्चा आणि वादविवादही झाले आहेत.
सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास
१. गुप्तचर यंत्रणांचे (Intelligence) अपयश?
हल्ल्याच्या काही दिवस आधीपासूनच ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस’ (IED) ने हल्ला होऊ शकतो, अशा सूचना होत्या. तरीही इतका मोठा ताफा (७८ गाड्या आणि २५०० जवान) एकाच वेळी रस्त्यावरून का पाठवण्यात आला?
२. ३०० किलो RDX आले कुठून?
काश्मीरसारख्या अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या आणि जागोजागी तपासणी नाके (Checkpoints) असलेल्या भागात ३०० किलोहून अधिक स्फोटके (RDX) एका गाडीत भरून पोहोचेपर्यंत कोणालाही सुगावा कसा लागला नाही? असाही प्रश्न उपस्थित होतो.
३. जवानांच्या वाहतुकीसाठी विमान सेवा का नाकारली?
तात्कालीन काही अहवालांनुसार, CRPF च्याजवानांच्या वाहतुकीसाठी ६ महिने आधीच गृहमंत्रालयाकडे विमानाची सोय करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती, परंतु ती नाकारली गेली. त्यामुळे जर रस्ता मार्गाने जाणे जोखमीचे होते, तर विमानाची परवानगी का दिली गेली नाही?
४. ‘लोकल’ गाडी ताफ्यात घुसलीच कशी?
लष्करी ताफा जेव्हा रस्त्यावरून जात असतो, तेव्हा सामान्यांसाठी वाहतूक पूर्णपणे थांबवली जाते. मग दहशतवाद्यांची गाडी हायवेवर आली कशी आणि जवानांच्या बसवर धडकली कशी? असाही प्रश्न आहे.
५. सत्यपाल मलिक यांचे गंभीर आरोप
जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडच्या काळात काही धक्कादायक विधाने केली होती. त्यांच्या मते, सुरक्षेतील त्रुटींबद्दल त्यांनी पंतप्रधानांना सांगितले होते, परंतु त्यांना ‘गप्प राहण्यास’ सांगण्यात आले. या आरोपांमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी, ७८ वाहनांचा एक ताफा जम्मू आणि काश्मीर महामार्गावरून प्रवास करत होता, ज्यामध्ये २५०० हून अधिक सीआरपीएफ जवान होते. दुपारी ३:१० वाजता, जेव्हा हा ताफा १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलवामा येथील लेथपोरा येथे पोहोचला तेव्हा अचानक एक कार महामार्गावर वेगाने आली, तिचे लक्ष्य ४० हून अधिक सैनिकांना घेऊन जाणारी बस होती. कारमध्ये ३०० किलोग्रॅमपेक्षा जास्त आरडीएक्स भरलेले होते जेणेकरून ती उडवून दिली जाईल. धडक लागताच, स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. बस आणि कारच्या धडकेने कारचे तुकडे झाले आणि संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला.
रस्त्यांवर सैनिकांचे मृतदेह विखुरले गेले संपूर्ण रस्ता रक्ताने माखला होता. सीआरपीएफ जवानांचे मृतदेह दिसत होते. पुलवामा हल्ल्यात ७६ व्या बटालियनचे ४० हून अधिक सैनिक शहीद झाले. त्या दिवशी संपूर्ण देश हादरून गेला होता. अनेक घरांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तेव्हापासून १४ फेब्रुवारी हा दिवस पुलवामा हल्ल्याची आठवण करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, पुलवामा हल्ल्याच्या बरोबर १२ दिवसांनी २५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. या दरम्यान, लष्कराने सुमारे ३०० पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. भारताने या हल्ल्याला बालाकोट एअरस्ट्राईक असे नाव दिले.