Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Assembly Election : राज्यात 6 लाखाहून जास्त दिव्यांग मतदार

राज्यात एकूण ९ कोटी ७० लाखाहून अधिक मतदार आहेत. या मतदारांपैकी ६ लाखाहून जास्त मतदार हे दिव्यांग मतदार आहेत. या दिव्यांग मतदारांबद्दल माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 06, 2024 | 02:37 AM
Maharashtra Assembly Election : राज्यात 6 लाखाहून जास्त दिव्यांग मतदार
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा  निवडणूक २०२४ चा प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोग ही मतदानाची पूर्वतयारी करत आहे. राज्यात या विधानसभेसाठी ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार कोटी मतदार आहेत. त्यातील दिव्यांग मतदारांची संख्ये बद्दल माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. राज्यात एकूण  ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३ लाख ८४ हजार ६९ हे पुरुष मतदार आहेत तर २ लाख ५७ हजार ३१७ महिला दिव्यांग मतदार आहेत यासोबतच ३९ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत.

हे देखील वाचा- “PM नरेंद्र मोदींच्या अशुभ हातांनी पुतळा उभारला म्हणून कोसळला” उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार

दिव्यांग मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यातील आहेत.  पुणे येथे ८८ हजार ९३७ दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये ४८ हजार ६२६ पुरुष, ४० हजार ३०१ महिला आणि १० तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. पुणे  पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात  ३८ हजार १४९ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये २१ हजार ५७३ पुरुष मतदार, १६ हजार ५७३ महिला मतदार आणि ३ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची सर्वात कमी नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे ६ हजार ४३ दिव्यांग मतदारांची नोंद आहे. यामध्ये ३ हजार ७१० पुरुष आणि २ हजार ३३३ महिला दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

तृतीयपंथी दिव्यांग मतदार

राज्यातील तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ३९ आहे. यापैकी सर्वाधिक तृतीयपंथी दिव्यांग मतदार हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. औरंगाबादमध्ये एकूण १२ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. पुणे जिल्ह्यात १०, नांदेड जिल्ह्यात ६, ठाणे जिल्ह्यात ३, पालघर आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी २ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. याशिवाय  लातूर, सोलापूर, मुंबई उपनगर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १ तृतीयपंथी दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत.

हे देखील वाचा-Maharashtra Election 2024; लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 25 हजार महिलांची पोलीस भरती; एकनाथ शिंदेंच्या नव्या घोषणा

मतदान आणि मतमोजणी

राज्यात काल दि. ४ ऑक्टोबर २०२४ ला विधानसभा निवडणूक  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आजपासून सर्वत्र प्रचार सभा सुरु झाल्या आहेत. पुढील १२ दिवस उमेदवारांकडून प्रचार केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ ला राज्याच्या विधानसभेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. या दिवशी महाराष्ट्र राज्यासोबत झारखंड राज्याचे निकालही जाहीर केले जाणार आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान केले जात आहे.

 

 

Web Title: Maharashtra assembly election more than 6 lakh divyang voters in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 10:38 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.