फोटो सौजन्य- सोशल मीडिया
कोल्हापूर: “आजच्या सभेने महाराष्ट्रातल्या इतिहासतला नवा अध्याय लिहीला जाणार आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा कोल्हापुरात होत आहे. आज प्रचाराचा नारळ फोडलाय पण 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथे आल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा जाहीरनाम्यातील 10 कलमे आहेत. पण हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, म्हणून आपला सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध करूच.असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपय देण्याचं आम्ही जाहीर करतो. महिला सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलीस भरती कऱण्याचा निर्णय़ घेणार आहोत. शेतकरी आपला अन्नदाता आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्याचा आहे. म्हणून आमची दुसरी योजना आहे कर्जमाफी. शेतकरी सन्मान योजना यात राज्य सरकारचे सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार आहेत त्यातही वाढ करून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसपी वर 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कुणीही उपाशी झोपणार नाही. राज्यात प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन आम्ही देत आहोत. महाराष्ट्रात कुणी भुकेला राहू नये अशी आमची भावना भावना आहे. वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये मदत निधी देण्याची आमची योजना आहे.जीवानावश्यक वस्तुचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याच आश्वासन आम्ही देत आहोत. शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. राज्यातील ग्रामीण भागात रस्ते बांधण्याचा निर्णय़ घेतला आहे.
हेही वाचा: धूम्रपान सोडायचा विचार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स
आपल्या महायुती सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. लेक लखपती योजना, पण लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोणीतही न्यायालयात गेले पण त्यांना न्यायालयाने फटकारले. आधी म्हणाले 1500 रुपये भीक देताय का पण माझ्या लाडक्या बहिणींबद्दल बोलण्यापूर्वी तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सांगितलं आहे. आता मीही सांगतो कुणाचाही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. वाढत जाईल हे आम्ही म्हणत होतो, ती आज आम्ही पूर्ण करणार आहोत. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर तुम्हाला देताना सरकारही मागेपुढे पाहणार नाही.
आज राज्यात देशात डबल इंजिनचं सरकार आहे. इतर लोक दिल्लील जातात ते मलाच मुख्यमंत्री करा असं सांगण्यासाठी. पण आम्ही जातो ते निधी आणण्यासाठी, रस्त्यांसाठी, रेल्वेंसाठी अनेक योजनांसाठी. म्हणून डबल इंजिन डबल गॅरंटी. त्यामुळे आम्हाला तिकडे जाण्यात कमीपणा वाटत नाही. या राज्याच्या विकासासाठी आम्ही पैसे मागत आहोत. आज मराठवाडा वॉटर ग्रीड असो, वा कोल्हापूरच्या पंचगंगेचा महापूर बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला मदत करणार आहेत. मग का नाही जायचं आम्ही. आम्ही तुमच्यासारखं लोटांगण घालायला जात नाही. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवरही ताशेरे ओढले.