sanjay raut reaction on maharashtra elections result 2024
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. काल (दि.20) संपूर्ण राज्यभरामध्ये मतदारांनी उत्साहाने मतदान केले. राज्यात सरासरी 65.11 टक्के मतदान झाले आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरली आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व उमेदवारांचा व पक्षांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्यामध्ये मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महायुती व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल लागणार आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अदानींवर देखील टीकास्त्र डागलं आहे.
महाराष्ट्राच्या 288 सर्व जागांवर एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडले. यावर प्रतिक्रिया खासदार संजय राऊत म्हणाले की, “एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठरवू नये. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल सत्य झाले हा तपासाचा भाग आहे. प्रचंड पैसे त्यांनी वाटले आहेत. तरी सुध्दा ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अभिमानावर लढलेली आहे. पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता लोकांनी मतदान केलं आहे. त्यामुळे निकाल हा आमचाच बाजूने लागणार आहे. आमच्या महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू,” असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सर्वांत जास्त सस्पेंन्स निर्माण करणारे ठरले आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही युतींनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीला लोक कौल देणार आहेत. त्यातून आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. नाना पटोले मुख्यमंत्री बनणार असतील. तर राहुल गांधींनी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींनी घोषणा केली पाहिजे,” असे मत संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
सरकार येण्यापूर्वी संजय राऊत यांनी अदानी यांना अटक करण्याची गोष्ट केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “अदानीमुळे देशाला डाग लागला आहे. महाराष्ट्रात जी लढाई झाली ती अदानी राष्ट्र बनू नये म्हणून ही लढाई सुरु आहे. निवडणूकीत 2000 हजार कोटींपेक्षा जास्त अदानींनी आले आहेत. ट्रम्प सरकारने गौतम अदानी विरोधात अश्यामुळेच अरेस्ट वॉरंट काढले आहेत. आम्ही 100 पेक्षा जास्त अरेस्ट वॉरंट काढू,” असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.