Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

पार्थ पवार यांना क्लीनचीट देणारी बातमी पूर्णपणे खोटी आणि राजकीय हेतूने पेरलेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील काही नेते स्वतःच्या हातात सूत्रे घेण्यासाठी घाई करत आहेत अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 17, 2026 | 01:38 PM
Anjali Damania press conference on Parth Pawar clean chit in Pune land scam case

Anjali Damania press conference on Parth Pawar clean chit in Pune land scam case

Follow Us
Follow Us:
  • मीडिया रिपोर्टनुसार, पुणे जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चीट
  • अंजली दमानिया यांनी घेतली पत्रकार परिषद
  • राजकीय दबावाखाली हा अहवाल बाहेर
Anjali Damania on Parth Pawar clean chit : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये मागील काही दिवसांपूर्वी वाढ झाली. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे नाव आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी पार्थ पवार यांना क्नीट चीट देण्यात आली आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. पार्थ पवार (Parth Pawar) यांना क्लीनचीट देणारी बातमी पूर्णपणे खोटी आणि राजकीय हेतूने पेरलेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील काही नेते स्वतःच्या हातात सूत्रे घेण्यासाठी घाई करत आहेत, असा गंभीर आरोप अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत पार्थ पवार यांना क्नीट चीट मिळाल्यावरुन आक्षेप घेतला आहे. पार्थ पवारांवर अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला. दमानिया म्हणाल्या की, “कोणताही अधिकृत अहवाल अद्याप बाहेर आलेला नसताना बातम्या कशा काय छापून येत आहेत? खारगे समितीला असा निकाल देण्याचा किंवा क्लीनचीट देण्याचा कोणताही अधिकार नाही. ही बातमी त्यांच्याच गटाकडून किंवा राजकारण्यांनी युतीचा भाग म्हणून माध्यमांमध्ये पेरली आहे,” असे अंजली दमानिया म्हणाले. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई असल्यानेच ही प्रतिमा सुधारण्याची मोहीम राबवली जात असल्याचेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

हे देखील वाचा : अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. या विमानाच्या ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका बसला आहे. यामधून रेकॉर्डिंग गेले असल्याचा दावा केला जात आहे. ही. ब्लॅक बॉक्समधील माहिती का रिकव्हर होत नाही? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांच्या निधनानंतर ज्या प्रकारची घाई केली जात आहे. त्यावरून समाजात मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. माझ्या मते भाजपची बी टीम उरलेले सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी हे सर्व घडवून आणले आहे. त्यांना आता पक्षाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घ्यायची आहेत,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.

हे देखील वाचा : “हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये एका लिपीकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याबाबत दमानिया म्हणाल्या की, “मंत्रालयात आज प्रत्येक कामाला रेट कार्ड आहे. ही लोकं कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून पैसे घेतात, याची चौकशी व्हायला हवी. सुनेत्रा पवार जर झिरवाळ यांच्यावर नाराज आहेत, तर त्या पार्थवर का नाहीत? तो मुलगा आहे म्हणून त्याला सोडून दिले जाते का? मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मेसेज करून या प्रकरणाच्या अहवालाची PDF मागितली आहे. जोपर्यंत अधिकृत अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत बातम्या देणे चुकीचे आहे. राजकीय दबावाखाली अहवाल बाहेर येऊ दिले जात नाहीत,” जसे एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात घडले होते, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

Web Title: Anjali damania press conference on parth pawar clean chit in pune land scam case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • anjali damania
  • parth pawar
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.