MNS Amit Thackeray's campaign begins
माहिम : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अवघ्या 20 दिवसांवर निवडणूक आली असून प्रचारासाठी केवळ 15 दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडी यांच्यासह मनसे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. मनसेकडून राज्यभरामध्ये उमेदवार जाहीर केले जात आहेत. पण मनसेच्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पहिल्यांदा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे जोरदार चर्चा देखील होत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरे हे निव़डणुकीच्या रिंगणात उतरले आहे. माहिम मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे मनसैनिकांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे. माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण रंगले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अमित ठाकरे हे त्यांची पत्नी मितालीह प्रचारात उतरले आहेत. मतदारसंघातील घराघरांमध्ये जाऊन ते मतदारांना प्रत्यक्ष भेटत आहेत. मतदारांची भेट घेऊन ते संवाद साधत आहेत. यावेळी अमित ठाकरेंनी ते कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवत आहे, त्यांच्याकडे मत मागण्यासाठी का आले आहेत, याबद्दलही सांगितले आहे.
प्रचारावेळी अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, मी माझं व्हिजन या लोकांपर्यंत मांडत आहे. ते कोणाला मतदान करणार आहेत, याबद्दलही मी लोकांना सांगत आहे. मी आता एका घरात गेलो, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की असा प्रचार कधीही झालेला नाही. आमच्याकडे कोणीही आलेलं नाही. मी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही कोणाला मतदान करताय हे त्यांना समजलं पाहिजे. मतदारसंघातील लोकंही खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. ते सेल्फी काढतात, ओवाळतात. मला शुभेच्छा देतात. मी २००९ लाही अशाप्रकारे फिरलो आहे. मला त्यांचा प्रतिसाद बघून खूपच छान वाटतंय. अनेक लोक तिकडच्या काही समस्या सांगत आहेत. यातील काही समस्या या लगेचच सोडवण्यासारख्या असतील तर त्या आम्ही लगेचच सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक नाही. कोणीही समोर असेल नसेल तरी मी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : भाजपचा ‘राज’ पुत्राला पाठिंबा, शिवसेना शिंदे गटाची काय असणार भूमिका?
महायुतीमध्ये मतभेद
माहिम मतदारसंघ हा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आला आहे. शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र भाजपकडून मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे पुत्र यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा देण्याचा विचार केला जात आहे. या मतदारसंघामध्ये उमेदवार न देता अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. मात्र शिंदे गटाचे नेते व उमेदवार सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करुन देखील ते आपल्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.