ncp rohini khadse target eknath shinde over Maharashtra cm post
जळगाव : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले. एक हाती सत्ता येईल असे मोठे बहुमत महायुतीला मिळाले आहे. मात्र एकतर्फी निकालानंतर देखील अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी शिंदेंच्या खात्यांवर मागणी भाजप पक्षाला मान्य नाहीत. यामुळे एकनाथ शिंदे यांना कोणती खाती मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यावर आता रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची दिल्लीवारी करुन अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये खातेवाटपाचा सर्व गुंता सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र त्या भेटीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे समोर आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे साताऱ्यातील मूळ गाव दरे येथे विश्राम घेतला. यामुळे सरकार स्थापनेला विलंब झाला. मात्र त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे ते गावी गेले असल्याचे समोर आले. अजून देखील एकनाथ शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे ठीक नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुतीमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरु असल्याचे स्पष्ट चित्र आहे. महायुतीकडे पूर्ण बहुमत असताना देखील अद्याप सरकार स्थापन करण्यात आलेले नाही. एकनाथ शिंदे यांना गृहखाते व नगर विकास खाते हवे आहे. तर यासाठी भाजपचा नकार आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाला शिंदे गटाऐवढे मंत्रिपदं हवी आहेत. यामुळे महायुतीचे सत्ता स्थापनेचे घोंगडे भिजत राहिले आहे. यावर आता रोहिणी खडसे यांनी कवितेच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी धारदार शब्दांमध्ये महायुतीचा व एकनाथ शिंदेंचा खरपूस समाचार घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला रोष व्यक्त केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या या नाराजीवर जोरदार भाष्य केले आहे. कवितेमध्ये रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की, रुसू बाई रुसू
रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू,
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू।
आहा… ही ही… हो हो,
आता तुमची गट्टी फू!
लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी,
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी।
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?
गाल गोबरे, गोरे गोरे,
लबाड डोळे, दोन टपोरे।
आनंदी या चंद्रमुखाचा,
उदास का दिसला?
राग तुझा कसला?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
बावन पत्ते बांधू बाळा,
शर्यत खेळू, घोडा घोडा।
घरादाराला खेळवणारा,
का झाला हिरमुसला?
राग तुझा कसला?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
चिमणी खाई मोती-दाणे,
गोड कोकीळा गाई गाणे।
अल्लड, भोळा गवई माझा,
अबोल का बसला?
राग तुझा कसला?
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
रुसू बाई रुसू
रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू,
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू।
आहा… ही ही… हो हो,
आता तुमची गट्टी फू!लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी,
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी।
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?…— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) December 3, 2024