लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाकडून मिळाली ऑफर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याचदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा एका पक्षाने प्रस्ताव दिला आहे.या पक्षाने बिश्नोई यांचे कौतुक करत त्यांना ‘क्रांतिकारक’ संबोधले आणि बिश्नोई यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे महत्त्वपूर्ण बदल घडू शकतील असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत एका पक्षाचे अजब विधान समोर आले आहे. या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स विश्नोईला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष – उत्तर भारतीय विकास सेना (UBVS) पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी बिश्नोई यांना औपचारिक पत्र लिहून त्यांची तुलना महान क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी केली आहे. पत्रात शुक्ला यांनी बिश्नोई यांचे कौतुक करत त्यांना ‘क्रांतिकारक’ संबोधले आणि बिश्नोई यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे महत्त्वपूर्ण बदल घडू शकतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या विजयासाठी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स विश्नोईची तुलना शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशी केली आहे त्यांना विजयी करण्यासाठी आमचे कार्यकर्ते आणि अधिकारी प्रयत्न करतील, असे पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
UBVS चे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “मुंबई विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेच्या 4 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांच्या मंजुरीनंतर आणखी 50 उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.” ते पुढे म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोईमध्ये आपण शहीद भगतसिंग पाहतो. लॉरेन्स यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “तुम्ही पंजाबमध्ये जन्मलेले उत्तर भारतीय आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही उत्तर भारतीय विकास सेना या नावाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत राजकीय पक्ष आहोत, जो उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी काम करतो”
उत्तर भारतीय विकास सेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे जो महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांच्या हक्कांचा पुरस्कार करतो. 29 मे 2022 रोजी पंजाबी रॅपर सिद्धू मूसवाला यांच्या हत्येशी जोडले गेले तेव्हा लॉरेन्स बिश्नोई, 31, पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले. काँग्रेस पक्षाचे सदस्य मूसेवाला यांची हत्या बिश्नोई यांच्या साथीदारांनी केली होती. टोळीयुद्धाचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले.
अलीकडेच बिष्णोई टोळीने ६६ वर्षीय राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. माजी आमदार आणि माजी मंत्री सिद्दीकी हे अभिनेता सलमान खानसह बॉलीवूड स्टार्सशी जवळच्या संबंधांसाठी ओळखले जात होते. सिद्दीकीच्या हत्येमुळे बिश्नोईच्या गुन्हेगारी कारनाम्यांबद्दल चिंता वाढली आहे, विशेषत: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतीय अधिकारी कॅनेडियन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या संघटित गुन्हेगारी गटांना माहिती पुरवत असल्याचा आरोप केल्यानंतर. 2015 पासून बिश्नोई तुरुंगात असले तरी त्यांचा गुन्हेगारी प्रभाव सतत वाढत आहे आणि आता एक राजकीय पक्ष त्यांना राजकीय क्षेत्रात येण्यासाठी खुलेपणाने राजी करत आहे.