Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurupaurnima : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सज्जनगडावर रंगला ‘समर्थ’चा भक्तिमय सोहळा!

गुरुपौर्णिमेनिमित्त आगामी मराठी चित्रपट ‘समर्थ’ मधील ‘बंध विमोचन राम’ या भक्तिगीताचे समर्थ रामदास स्वामींची कर्मभूमी असलेल्या सज्जनगडावर अनावरण करण्यात आले. संत वेण्णास्वामी यांच्या रचनेला केदार पंडित यांचे संगीत आणि आर्या आंबेकर यांचा स्वर लाभलेल्या या गीताचे चित्रीकरणही सज्जनगडावरच झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 30, 2026 | 07:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर आगामी मराठी चित्रपट ‘समर्थ’ मधील ‘बंध विमोचन राम’ या भक्तिरसपूर्ण गीताचे समर्थ रामदास स्वामींची कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या गीताचे चित्रीकरणही याच पवित्र स्थळी करण्यात आल्याने हा सोहळा अधिक भावपूर्ण ठरला. समर्थांच्या स्मृतींनी भारावलेल्या वातावरणात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित राहून समर्थ विचारांना अभिवादन केले.

Salman Khan: सलमानने ३.५ कोटींना विकला वांद्रेतील फ्लॅट, आता समुद्रकिनारी उभारणार ६ मजली आलिशान ड्रीम होम

संत वेण्णास्वामी यांनी रचलेल्या या भक्तिगीताला ज्येष्ठ संगीतकार केदार पंडित यांनी संगीत दिले असून, गायिका आर्या आंबेकर यांच्या स्वरांनी गीताला भक्तिरसाची उंची प्राप्त झाली आहे. सज्जनगड संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी गीताचे सादरीकरण, संगीत आणि गायनाचे कौतुक करत चित्रपटालाही शुभेच्छा दिल्या.

दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी ‘समर्थ’ हा चित्रपट समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आजच्या पिढीशी संवाद घडवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तर निर्माता रविंद्र पाठक यांनी ‘बंध विमोचन राम’ हे गीत भक्ती, समर्पण आणि आत्ममुक्तीचा संदेश देणारे असून त्याचे अनावरण सज्जनगडावरच व्हावे, अशी इच्छा असल्याचे नमूद केले. क्रिएटिव्ह प्रोड्यूसर अमोल भगत यांनीही हा सोहळा संपूर्ण टीमसाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले.

Spider Man Movie Review : टॉम हॉलंडचा ‘स्पायडर-मॅन’ ठरला सुपरहिट? सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलफगर यांनी केले आहे. चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक काळाशी जोडणारा हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: A devotional celebration dedicated to samarth unfolded at sajjangad on the auspicious occasion of guru purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 07:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.