
Kaun Banega Crorepati season 18
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या शो पैंकी एक म्हणून ओळखला जाणार म्हणजे कौन बनेगा करोडपती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा कार्यक्रम आता 18 व्या पर्वासह नव्या रुपात दाखल होत आहे. यावेळी केवळ प्रश्नांची उत्तरे माहिती असणे पुरेसे ठरणार नाही तर, योग्यवेळी विचार करुन निर्णय घेण्याची क्षमता देखील महत्त्वाची ठरणार आहे.
या सीझनमध्ये खेळाची पद्धत बदलणार..
अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी …
या नवीन पर्वाचे सुत्रसंचालन पुन्हा एकदा ज्येष्ठा अभिनेते, सुपरस्टार अमिताभ बच्चन करणार आहेत. त्यांच्या खास शैलीमुळे आणि प्रभावी संवादांमुळे हा कार्यक्रम आजही घराघरात तितकाच लोकप्रिय आणि आवडीचा आहे. नव्या सीझनसाठी त्यांनी पुन्हा एकदा मंचावर हजेरी लावल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणीत होतो. या कार्यक्रमापुर्वी यांचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये खेळाची पद्धत आता बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.
पहिला प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन एका कॅफेमध्ये…
एका व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हे एका कॅफेमध्ये बसून लोकांशी संवाद साधताना दिसतात. ते सांगतात की, आज माहिती मिळवणे फार कठीण राहिलेले नाही. मोबाईल आणि इंटरनेटमुळे काही सेकंदांत कोणतीही माहिती मिळू शकते. त्यामुळे केवळ माहिती पाठ करून स्पर्धा जिंकणे आता शक्य होणार नाही. त्यासाठी विचार करण्याची पद्धत आणि निर्णय घेण्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन विमानतळावर
दुसऱ्या प्रोमोमध्ये ते विमानतळावर दिसतात. तेथेही ते याच मुद्द्यावर भर देतात की, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड राहिलेले नाही, पण योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी मेंदूचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे या सीझनमध्ये स्पर्धकांसमोर वेगळ्या प्रकारची आव्हाने असतील.
तिसऱ्या प्रोमोमध्ये तंत्रज्ञानाचा विषय
तिसऱ्या प्रोमोमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा विषय मांडण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयमुळे जग झपाट्याने बदलत असल्याचे अमिताभ बच्चन सांगतात. पूर्वी ज्यासाठी अनेक तास लागायचे, ती कामे आता काही क्षणांत पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत माणसानेही स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे. याच विचारातून KBCच्या नव्या पर्वात काही वेगळे नियम आणि नवीन अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहेत.
Kaun Banega Crorepati मध्ये 1 कोटी जिंकल्यावर खात्यात किती रक्कम …
या कार्यक्रमात देशाच्या विविध भागांतून आलेले स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रत्येकजण आपल्या ज्ञानाच्या बळावर मोठी रक्कम जिंकण्याचे स्वप्न घेऊन हॉट सीटवर बसणार आहे. मात्र, यावेळी त्यांची परीक्षा केवळ सामान्य ज्ञानावर होणार नसून, त्यांची निरीक्षणशक्ती, शांतपणे विचार करण्याची सवय आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील तपासली जाणार आहे.
अमिताभ बच्चन यांच्या आवाजात “लॉक किया जाए?” हा प्रसिद्ध डायलॉग पुन्हा ऐकू येणार
केबीसीने अनेक सामान्य नागरिकांचे आयुष्य बदलले आहे. या मंचावरून अनेकांनी मोठी रक्कम जिंकली, तर काहींनी आपल्या प्रेरणादायी संघर्षामुळे देशभरातील लोकांची मने जिंकली. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ पैशांचा खेळ नसून, आत्मविश्वास, मेहनत आणि ज्ञानाचा उत्सव म्हणूनही ओळखला जातो. नवीन पर्वाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकजण पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्या आवाजात “लॉक किया जाए?” हा प्रसिद्ध डायलॉग पुन्हा ऐकू य़ेणार आहे. हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम १० ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येईल. टीव्हीसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही तो उपलब्ध असणार आहे. नवीन नियम, वेगळे प्रश्न आणि बदलत्या काळाशी जुळवून घेतलेली संकल्पना यामुळे केबीसीचा १८वा सीझन प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.