Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pranit More Controversy : टीका न करता सोडले बाण! म्हणाले ‘कुटुंबासोबत असे शो…’ Stand up कॉमेडीविषयी भाऊंचे मत

Bhau Kadam : सध्याच्या स्टँडअप कॉमेडी ट्रेंडवर अभिनेता Bhau Kadam यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, स्टँडअप कॉमेडीचा ट्रेंड पुढेही सुरू राहील, मात्र असे कार्यक्रम पाहायचे की नाही हा निर्णय प्रेक्षकांनी घ्यायचा आहे. शिवीगाळ असलेल्या कार्यक्रमांचा भाग होणे आपल्याला आवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 13, 2026 | 07:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडिया हॅण्डल सस्पेंडही करण्यात आले होते.
  • Stand Up कॉमेडीविषयी विचारले जाते तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.
  • “दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी मी मित्रांसोबत जाऊ शकतो, पण तोच कार्यक्रम कुटुंबासोबत…
महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता, अष्टपैलू कलाकार आणि विनोदवीर भाऊ कदम आपल्या अभिनयाने तसेच विनोदांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे. जिथे भाऊ कदम असणार तिथे कुणी कशालाच भावुक होणार. भाऊ कदम म्हणजे आनंद, हसणं! या उमद्या कलाकाराला सध्याच्या Stand Up कॉमेडी ट्रेंडविषयी काय वाटतं? हे विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी त्याच्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर मांडल्या.

Amruta Khanvilkar : नाटकाने सुवर्ण अंक गाठला अन् अभिनेत्रीने नाटक सोडलं! अमृताच्या जागी ‘या’ नव्या चेहऱ्याला मिळणार संधी

सध्या देशभरात प्रणित मोरे शोमुळे वातावरण थोडंसं तापलं आहे. हिमांशू जागरा आणि सेजल पवार या दोन उत्साही प्रेक्षकांमुळे प्रणित मोरे शोला मोठा प्रमाणात द्वेषाचा सामना करावा लागत आहे. चालू शोदरम्यान करण्यात आलेल्या वायफळ अश्लील चर्चा आणि आक्षेपार्ह विधानांमुळे प्रणित मोरेला संपूर्ण देशासमोर हात जोडून माफी मागण्याची वेळ आली आहे. त्याचे सोशल मीडिया हॅण्डल सस्पेंडही करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्राचा विनोदवीर भाऊ कदम यांना जेव्हा Stand Up कॉमेडीविषयी विचारले जाते तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

मुलाखतीत भाऊ म्हणतात की, “सध्या स्टँडअप कॉमेडीचा ट्रेंड सुरू आहे. तो पुढेही कायम राहील. असे कार्यक्रम पाहायचे की नाही, हा निर्णय प्रेक्षकांनी स्वतः घ्यायचा असतो. हे शो पाहणारे लोकही आपल्यासारखेच असतात आणि प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. वैयक्तिकरित्या मला शिवीगाळ असलेल्या कार्यक्रमांमध्ये जाणे आवडत नाही, त्यामुळे मी अशा शोचा भाग होणार नाही. मात्र, म्हणून सर्वच स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमांना चुकीचे किंवा वाईट म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार मनोरंजनाची निवड करावी.”

पुढे भाऊ म्हणतात की,“जे कलाकार खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहेत, त्यांच्या कामाचे आवर्जून कौतुक केले पाहिजे. आज अनेक स्टँडअप कॉमेडियन उत्तम काम करत असून त्यांच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांना आर्थिक यशही मिळत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र, मनोरंजन करताना सामाजिक भान जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वैयक्तिकरित्या काही स्टँडअप कॉमेडी शो मी माझ्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही. एखादा दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी मी मित्रांसोबत जाऊ शकतो, पण तोच कार्यक्रम कुटुंबासोबत पाहताना मला संकोच वाटेल.”

‘Wowww… धमाल 4 मध्ये Namrata Sambherao!’ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ची लॉली, बॉलिवूडमध्ये करणार धमाल

एकंदरीत, प्रणित मोरे शोच्या मुद्द्यानंतर देशभरात स्टॅन्ड अप कॉमेडी या विषयावर चर्चासत्र सुरु आहेत. त्यात अनेक जण त्यांची मते मांडत आहेत. मराठी विनोदी अभिनय क्षेत्रात तासलेला पठ्ठ्या अभिनेते भाऊ कदम यांनी कुणावर कसलीही टीका न करता एकंदरीत बाण सोडले आहेत.

Web Title: Bhau kadam about pranit more controversy and stand up comedi shows

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.