Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishi Thapanda : सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीच्या घरी व्यावसायिकाचा मृतदेह! कोण आहे हा तरुण? अभिनेत्रीशी काय संबंध? शोध सुरु

कन्नड अभिनेत्री Krishi Thapanda हिच्या बंगळुरूतील फ्लॅटमध्ये ३३ वर्षीय वैषाकचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. राजराजेश्वरी नगर येथील एलिगंट्स अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून, प्राथमिक तपासात वैषाकने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2026 | 08:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
  • अभिनेत्रीच्या घरी राहत होता किंवा तेथे वारंवार ये-जा करत होता
  • गुन्हा एचएएल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
कन्नड अभिनेत्री कृषी थापंडा हिच्या बंगळुरूतील निवासस्थानी ३३ वर्षीय वैषाकचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूमागील नेमकी कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजराजेश्वरी नगर येथील एलिगंट्स अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, वैषाक बुधवारी रात्री कृषी थापंडाच्या फ्लॅटमध्ये आला होता. त्यानंतर फ्लॅटमध्ये कोणीही नसताना त्याने गळफास घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटना घडली तेव्हा कृषी थापंडा घरी नसल्याचे समोर आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तसेच आवश्यक फॉरेन्सिक पुरावेही गोळा केले. मृतदेह पुढील तपासणीसाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Mumbai Local Train Murder : मयंक हत्ये प्रकरणावर व्यक्त झाला सुप्रसिद्ध अभिनेता! पोस्ट करत बघ्यांना सुनावले खडेबोल

पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. वैषाकच्या मृत्यूपूर्वीच्या हालचाली, त्याची मानसिक अवस्था आणि तो अभिनेत्रीच्या घरी का आला होता, याचा तपास केला जात आहे. याशिवाय अभिनेत्री कृषी थापंडा आणि वैषाकच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैषाक गेल्या काही काळापासून वैवाहिक अडचणींना सामोरा जात होता. पत्नीशी मतभेद झाल्यानंतर तो वेगळा राहत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच काळात तो अभिनेत्रीच्या घरी राहत होता किंवा तेथे वारंवार ये-जा करत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

Mumbai Local Murder Case : अभिनेत्रीने व्यक्त केला संताप! मुंबईच्या सुरक्षेवर केले प्रश्न; ‘वाचवायचं सोडून लोक रील बनवत…’

दरम्यान, वैषाक याचे नाव यापूर्वी एका वादग्रस्त प्रकरणातही समोर आले होते. बंगळुरूतील व्यावसायिक अरविंद रेड्डी यांना कथित धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा गुन्हा एचएएल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

या घटनेमुळे कन्नड चित्रपटसृष्टीत आणि सामाजिक माध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पोलीसांनी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. सध्या आरआर नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Web Title: Businessmans body found at the home of renowned kannada actress krishi thapanda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Brutal murder
  • Sucide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.