Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये अजय देवगणची एन्ट्री; थरारक केसेसचा प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

Ajay Devgn Crime Patrol 2026: अजय देवगण ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहे. ‘क्राईम पेट्रोल २०२६’चा नवा सीझन ३१ ऑगस्टपासून सुरू होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 11, 2026 | 11:36 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या आगामी सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला असून, या प्रोमोने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘क्राईम पेट्रोल २०२६ – क्राईम का करंट सीझन’ या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेता अजय देवगण करणार आहे. त्यामुळे अजय देवगण आता टीव्हीवर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पदार्पण करताना दिसणार आहे.

अनुप सोनीनंतर अजय देवगणकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी

अजय देवगण ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. यापूर्वी या शोचं सूत्रसंचालन अनुप सोनी यांनी केलं होतं. अनुप सोनी यांनी २०१८ मध्ये शो सोडल्यानंतर आता अजय देवगण या लोकप्रिय क्राईम शोची सूत्रं हाती घेणार आहे.

अजय देवगणला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून, नव्या प्रोमोमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘आपलंच रक्ताचं नातं असतं…’; अजय देवगणचा दमदार प्रोमो

नव्या प्रोमोमध्ये अजय देवगण गुन्ह्यांच्या बदलत्या स्वरूपाबद्दल बोलताना दिसतो. तो सांगतो की लहानपणापासून आपल्याला अनोळखी व्यक्तींपासून सावध राहायला आणि रात्री घराला कुलूप लावायला शिकवलं जातं. मात्र, आज अनेक प्रकरणांमध्ये धोका अनोळखी व्यक्तीकडून नव्हे, तर आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडूनच निर्माण होतो.

अजय देवगण पुढे सांगतो की अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला घराचा रस्ता, घराच्या चाव्या आणि कुटुंबाची माहितीही असते. “बऱ्याच प्रकरणांमध्ये हे आपलंच रक्ताचं नातं असतं आणि हे धक्कादायक आहे,” असं तो प्रोमोमध्ये म्हणतो.

Sunita Ahuja On Govinda: ‘बुद्धी भ्रष्ट झाली आहे…’ गोविंदा-कोमल राणीच्या व्हिडिओवर सुनीता आहुजा संतापल्या; मागितलं उत्तर

देश हादरवून सोडणाऱ्या केसेसचा उलगडा होणार

नव्या सीझनमध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अनेक गुन्ह्यांची प्रकरणं दाखवण्यात येणार आहेत. प्रोमोमध्ये अजय देवगण म्हणतो की, अशाच काही प्रकरणांमध्ये तो प्रेक्षकांसोबत असेल आणि ‘क्राईम पेट्रोल’च्या माध्यमातून त्या केसेस एकत्र समजून घेतल्या जातील.

अजयच्या गंभीर आणि दमदार अंदाजामुळे प्रोमोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

‘क्राईम पेट्रोल’चा नवा सीझन कधी सुरू होणार?

‘क्राईम पेट्रोल २०२६ – क्राईम का करंट सीझन’ हा नवा सीझन ३१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.

अनुप सोनी यांनी ‘क्राईम पेट्रोल’ का सोडलं?

अनुप सोनी २०१० मध्ये ‘क्राईम पेट्रोल’शी जोडले गेले होते. अनेक वर्षे त्यांनी या शोचं सूत्रसंचालन केलं. मात्र, २०१८ मध्ये त्यांनी शोमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

शो सोडण्यामागचं कारण सांगताना अनुप सोनी यांनी अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘क्राईम पेट्रोल’मध्ये वारंवार खून, बलात्कार आणि मालमत्तेच्या वादांसारख्या प्रकरणांवर बोलत असल्याचं सांगत त्यांनी वेगळ्या भूमिकांकडे वळण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र, सूत्रसंचालक म्हणून शो सोडल्यानंतरही अनुप सोनी विशेष भागांमध्ये ‘क्राईम पेट्रोल’मध्ये दिसले होते. आता अजय देवगण नव्या सीझनची सूत्रं हाती घेणार असल्याने या शोच्या नव्या पर्वाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा

Web Title: Crime patrol 2026 ajay devgn entry the new season promo release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Ajay Devgan
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
1

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
2

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.