(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sunita Ahuja On Govinda: बॉलिवूडचा ‘नंबर १’ हिरो गोविंदा लवकरच ‘रूपा’ या चित्रपटातून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, कमबॅकपूर्वीच तो पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओबाबत गोविंदाची पत्नी Sunita Ahuja यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.(Sunita Ahuja On Govinda)
काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे गोविंदाच्या आगामी ‘रूपा’ चित्रपटात कोमल राणी स्वर्णकर अभिनेत्री म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वीही सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीत गोविंदाच्या आयुष्यात ‘कोमल’ नावाच्या महिलेचा उल्लेख केला होता. त्यामुळे या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चर्चांना आणखी उधाण आले.
पापाराझींनी सुनीता आहुजा यांना गोविंदा आणि कोमल राणीच्या व्हायरल व्हिडिओबद्दल विचारले. यावर सुनीता म्हणाल्या, “मी एक म्हण ऐकली आहे, ‘विनाशाच्या काळात बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून तो हे सर्व करतो.’”
पुढे पापाराझींनी गोविंदाला सोशल मीडियावर काही जण ‘चीटर नंबर १’ म्हणत असल्याचे सांगितले. यावर सुनीता यांनी गोविंदाच्या चाहत्यांनाच प्रश्न विचारला.
‘गोविंदाच्या चाहत्यांकडून आणि मीडियाकडून उत्तर हवे’
सुनीता म्हणाल्या, “मला हा प्रश्न गोविंदाच्या चाहत्यांना विचारावा लागतो, कारण मी काही बोलले तर सगळे मला ट्रोल करतात. मला गोविंदाच्या चाहत्यांकडून आणि मीडियाकडून याचे उत्तर हवे आहे. मला विचारू नका, मला त्यात अजिबात रस नाही. जेव्हा मी खरं सांगते, तेव्हा सगळे मला शिव्या देतात.”
सुनीता यांच्या या वक्तव्यामुळे गोविंदा-कोमल राणी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, गोविंदाने एका पॉडकास्टमध्ये सुनीता आहुजा यांनी केलेल्या अफेअरच्या आरोपांवर भाष्य केले होते. एएनआयशी बोलताना अभिनेत्याने आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देत तो वयाच्या ३४ वर्षांपर्यंत खूप निरागस होता, असं म्हटलं होतं.
गोविंदाने पुढे “जर तुम्ही मिठाईच्या दुकानात राहून उपाशी परतलात, तर त्यात दुःखद काय आहे?” असं वक्तव्य केलं होतं. त्याचं हे विधान सुनीता यांच्या आरोपांशी संबंधित असल्याचं मानलं गेलं.
सुनीता आहुजा अलीकडेच नेटफ्लिक्सच्या ‘लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर’ या शोमध्ये दिसल्या होत्या. गोविंदा आणि त्यांची मुलगी टीना आहुजा त्यांना शोमधून घरी घेण्यासाठी आले होते. दरम्यान, आता गोविंदा-कोमल राणीच्या व्हिडिओवर सुनीता यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.
Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत






