Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTT Releases 6 November:ओटीटी प्रेक्षकांसाठी खुशखबर! ६ नोव्हेंबरला रिलीज होणार ५ नवे चित्रपट आणि सीरिज; पाहा संपूर्ण यादी!

OTT Releases 6 November: सिद्धार्थ मल्होत्राचा ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’, दुल्कर सलमानचा ‘आय अॅम गेम’ यांसह ६ नोव्हेंबरला ओटीटीवर ५ नवे चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2026 | 11:46 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

OTT Releases 6 November: ओटीटीवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ६ नोव्हेंबर हा दिवस खास असणार आहे. या दिवशी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवे चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांचा ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’, दुल्कर सलमानचा अॅक्शन थ्रिलर ‘आय अॅम गेम’ यांसह इतर चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगली मेजवानी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया, ६ नोव्हेंबरला ओटीटीवर कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

1‘हैवान’ (Haiwaan) हा सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट ६ नोव्हेंबरला सोनीलिव्हवर प्रदर्शित होणार आहे. प्रियदर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट ‘ओप्पम’चा हा हिंदी रिमेक आहे. यात सैफ अली खान एका दृष्टिहीन केअरटेकरची भूमिका साकारत असून, अक्षय कुमार एका खतरनाक मारेकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

2. ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ (The Vvaan: Force of the Forest)

सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्वेता तिवारी, सुनील ग्रोवर आणि नामिश पॉल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या विषयाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

3. ‘आय अॅम गेम’ (I Am Game)

दुल्कर सलमानचा ‘आय अॅम गेम’ हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. नहास हिदायत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये दुल्कर सलमान डॅन जॉन नावाच्या निर्भीड जुगाऱ्याची भूमिका साकारत आहे. डॅनचा स्वतःच्या नशिबावर प्रचंड विश्वास असून त्याला धोका पत्करण्याची आवड आहे. मात्र, त्याचा हाच छंद त्याला हळूहळू धोकादायक परिस्थितीत घेऊन जातो. त्यानंतर त्याच्यासमोर अशी आव्हानं उभी राहतात, ज्यातून बाहेर पडणं कठीण ठरतं. आता डॅन या संकटांवर कशी मात करतो, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

4 ‘मीसाया मुरुक्कू २’ (Meesaya Murukku 2)

‘मीसाया मुरुक्कू २’ हा म्युझिकल कॉमेडी चित्रपट सोनीलिव्हवर प्रदर्शित होणार आहे. आदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ते स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत केतिका शर्मा, चैत्रा जे. आचार आणि रम्या रंगनाथन यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटात जीवा नावाचा तरुण संगीतकार आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मुलगा त्याच्या जोडीदारामध्ये रस दाखवू लागतो आणि त्याच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात. याच दरम्यान जीवाला आपल्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या संगीताच्या इतिहासाची आणि वारशाची माहिती मिळते. या चित्रपटात आदी वेगवेगळ्या पिढ्यांमधील पात्रं साकारताना दिसणार आहे.

5. ‘नूरू कोडी वानाविल’ (Nooru Kodi Vaanavil)

‘नूरू कोडी वानाविल’ हा रोमँटिक ड्रामा चित्रपट झी५वर प्रदर्शित होणार आहे. शशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हरीश कल्याण आणि सिद्धी इदाननी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

एका तरुण जोडप्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. प्रेमासोबतच या दोघांना कौटुंबिक अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि विविध दबावांचा सामना करावा लागतो. नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी कधी तडजोड करावी लागते, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव

Web Title: Ott releases 6 november 2026 new movies web series ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Bollywood News
  • entertainment
  • OTT

संबंधित बातम्या

Aamir Khan: गौरी स्प्रॅटशी लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच आमिर खानवर घर सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
1

Aamir Khan: गौरी स्प्रॅटशी लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच आमिर खानवर घर सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
2

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव
3

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण
4

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.