Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Divyanka Tripathi Building Fire: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीत भीषण आग; थोडक्यात बचावली, पण कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Divyanka Tripathi: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या कुटुंबावर दिवाळीच्या काळात दुःखाचा डोंगर कोसळला. 7 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या आदल्या रात्री मुंबईतील त्यांच्या इमारतीला भीषण आग लागली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 10, 2026 | 04:38 PM
Divyanka Tripathi Building Fire: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Divyanka Tripathi Building Fire: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या आदल्या रात्री दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला आग.
  • अभिनेत्री, पती विवेक आणि जुळ्या मुलांची सुखरूप सुटका.
  • इमारतीचे सुरक्षारक्षक धनपत अंकल यांचा आगीत मृत्यू.

 

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी अलीकडेच आपल्या मुलांची नावे दैविक आणि वैद्विक अशी असल्याचं जाहीर केलं होतं. आता या चिमुकल्यांच्या जन्मानंतर त्यांना आशीर्वाद देणाऱ्या धनपत अंकल यांचे निधन झाल्याने दिव्यांका आणि विवेक भावूक झाले आहेत.टीव्हीवरची आपली सगळ्यांची आवडती दिव्यांका त्रिपाठी.

दिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे आनंद असतो. पण दिव्यांकाच्या घरात यावेळी दिवाळीच्या आनंदातच दुःखाचा डोंगर कोसळला. दिवाळीच्या आदल्या रात्री मुंबईतल्या तिच्या इमारतीला भीषण आग लागली. त्यावेळी दिव्यांका, तिचा नवरा विवेक दहिया, त्यांची जुळी मुलं, घरातले सगळे आणि काम करणारी माणसं इमारतीतच होती.

नशीब चांगलं म्हणून सगळे वेळेत बाहेर पडले. नाहीतर काय झालं असतं, विचार पण करवत नाही. पण या सगळ्यात इमारतीचे वॉचमन धनपत अंकल मात्र गेले. त्यांच्या जाण्याने दिव्यांका आणि विवेकला खूप मोठा धक्का बसलाय. दिव्यांकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपलं दुःख व्यक्त केलंय. तिने 10 नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर आगीचे व्हिडीओ पण टाकलेत. Divyanka Tripathi Building Fire

त्या रात्री नेमकं काय झालं?

7 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या आदल्या रात्री ही घटना घडली. तो दिवस विवेकच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवसाचा पण होता. त्या दिवशी घरच्यांनी बाहेर जायचा प्लॅन केला होता. पण काही ना काही कारणाने तो प्लॅन सारखा पुढे जात होता. म्हणून सगळे घरीच थांबले होते. आणि नेमकं त्याच वेळी आग लागली.

Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये आगींचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग

आग लागल्याचं कळताच दिव्यांका आणि विवेकने लहान बाळांना उचललं, घरच्यांना, कामवाल्यांना घेऊन ताबडतोब खाली धाव घेतली. सगळे बाहेर आल्यावर पहिल्यांदा एकच वाटलं, चला जीव वाचला. बाकी सगळं ठीक होईल.पण थोड्या वेळाने एक बातमी आली आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

इमारतीचे सुरक्षारक्षक धनपत अंकल यांचं या आगीत निधन झालंय. हे ऐकून दिव्यांका आणि विवेकला विश्वासच बसेना. ते एका मित्राच्या घरी जाऊन राहिले होते. तिथे बसून ही बातमी खोटी असावी, अशीच प्रार्थना करत होते. पण ती बातमी खरी होती.धनपत अंकल कोण होते?दिव्यांकाने तिच्या पोस्टमध्ये धनपत अंकल यांच्याबद्दल खूप आठवणी सांगितल्या आहेत. ती म्हणाली, जेव्हा आम्ही आमच्या जुळ्या मुलांना पहिल्यांदा घरी आणलं, तेव्हा त्यांचं स्वागत करणाऱ्या आणि आशीर्वाद देणाऱ्या पहिल्या लोकांपैकी धनपत अंकल होते.

ते फक्त इमारतीचे वॉचमन नव्हते. ते आमच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग होते. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. आम्ही स्वप्नं बघितली होती, आमची मुलं मोठी होतील, धनपत अंकल त्यांच्यासोबत खेळतील, त्यांना हसवतील. पण आता हे सगळं फक्त स्वप्नच राहिलं.दिव्यांकाने पोस्टची सुरुवातच खूप भावनिक शब्दात केलीय. ती म्हणाली, “काही नुकसान आपल्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण करून जातात, जी कधीच भरून निघत नाही.”खरं आहे. माणूस गेला की त्याची जागा कोणीच भरू शकत नाही. धनपत अंकल रोज दारात भेटणारे, हसून बोलणारे, मुलांना बघून खुश होणारे होते. आता ते नसणार, हे पचवणं अवघड आहे.

दिवे परत आले, पण माणूस नाही

दिवाळीच्या दिवशी इमारतीची लाईट हळूहळू परत आली. मग सगळी तपासणी करून गॅस आणि लिफ्ट पण सुरू केली. घरातले दिवे परत लागले. पण दिव्यांका म्हणते, घरातले दिवे लागले तरी काय, एक अनमोल माणूस आपण गमावलाय, ते दुःख कधीच जाणार नाही.

दिवाळी म्हणजे आनंद, फटाके, दिवे. पण दिव्यांकाची दिवाळी यावेळी अंधारात गेली. दोन छोटी बाळं घेऊन ती आगीतून बाहेर पडली, हे किती भयानक असेल विचार करा. एका बाजूला बाळांची काळजी, दुसऱ्या बाजूला धनपत अंकल गेल्याचं दुःख.दिव्यांका आणि विवेकने आत्ताच मुलांची नावं जाहीर केली होती. दैविक आणि वैद्विक. सगळे त्यांना शुभेच्छा देत होते. आणि त्याच वेळी हा अपघात झाला. धनपत अंकल यांनी त्या बाळांना पहिल्यांदा आशीर्वाद दिला होता. आता ते नाहीत, ही गोष्ट दिव्यांकाला खूप टोचतेय.

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व

लोकांनी पण तिच्या पोस्टवर खूप प्रेम दिलंय. सगळे म्हणतायत, धनपत अंकल यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि दिव्यांकाच्या कुटुंबाला धीर देतायत.खरंच, इमारतीतला वॉचमन म्हणजे फक्त वॉचमन नसतो. तो घराचाच एक भाग असतो. आणि तो गेला की घरातली एक जागा कायमची रिकामी होते.

Web Title: Divyanka tripathi mumbai building fire dhanpat uncle death rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 04:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.