लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ती बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर होती आणि तिच्या गरोदरपणाच्या अफवा सतत पसरत होत्या. पण आता, हे जोडपे अखेर त्यांच्या घरी एका लहान पाहुण्याचे स्वागत करणार आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया यांनी इन्स्टाग्रामवर आई- बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तसेच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
वयाच्या 41 व्या वर्षी Divyanka Tripathi होणार आई; पती विवेकसोबत पोज देत फ्लॉन्ट केला बेबी बंप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

दिव्यांका त्रिपाठीने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी जवळपास सहा महिने गुप्त ठेवली होती. फोटो शेअर करण्यापूर्वीच या जोडप्यानी सांगितले होते की, लग्नाच्या १० वर्षांनंतर त्यांनी हे नियोजन केलेले सुरळीत पार पडले आहे. तसेच, या लहान पाहुण्याच्या आगमनाने त्यांच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे.

दिव्यांका त्रिपाठी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती काही काळापासून प्रसिद्धीपासूनही दूर राहत आहे. तिची प्रसूती जून महिन्याच्या मध्यात अपेक्षित आहे. दरम्यान, तिच्या मॅटर्निटी फोटोशूटने सर्वांची मने जिंकली आहेत.

दिव्यांका त्रिपाठी पांढऱ्या ड्रेसमध्ये आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली आहे. तिने आपला लूक साधा ठेवला होता. अभिनेत्रीने वेव्ही हेअरस्टाईलसोबत मॅचिंग मोत्याचे कानातले आणि नेकलेस देखील घातला आहे. विवेक दहियानेही पांढरा शर्ट आणि पँट परिधान करून पत्नीसोबत ट्विनिंग केले आहे.

वयाच्या 41 व्या वर्षी Divyanka Tripathi होणार आई; पती विवेकसोबत पोज देत फ्लॉन्ट केला बेबी बंप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

दिव्यांका त्रिपाठीने कॅप्शनमध्ये लिहिले, "१० वर्षांनंतर, आयुष्यात एक नवीन वळण. काही प्रवास घाईगडबडीत करायचे नसतात... ते एकत्र मिळून घडवायचे असतात. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचे आयुष्य पूर्ण झाले आहे, तेव्हा आयुष्य त्यात एक सर्वात सुंदर अध्याय जोडला जातो. अजूनही त्या भावनेत रमून गेलो आहोत... अजूनही विनाकारण हसत आहोत. मनात कृतज्ञता बाळगून, आम्ही लवकरच पालक होणार आहोत." असे लिहिले आहे.






