
फोटो सौजन्य - Social Media
तारिणी मालिकेची टीम फूडचं पाऊलमध्ये!
लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे अभिनयासोबतच उद्योजिका म्हणूनही यशस्वी वाटचाल करत आहे. मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या तिच्या ‘फुडचं पाऊल’ या रेस्टॉरंटला नुकतीच झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेच्या कलाकारांनी विशेष भेट दिली. या वेळी अभिनेत्री अभिज्ञा भावे, शिवानी सोनार, अभिनेता स्वराज नागरगोजे तसेच मालिकेतील इतर कलाकार उपस्थित होते.
या भेटीदरम्यान कलाकारांनी रेस्टॉरंटमधील विविध नॉनव्हेज पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. गप्पा, हशा आणि एकमेकांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले. व्यस्त चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून वेळ काढत कलाकारांनी एकत्रितपणे निवांत वेळ घालवल्याचे पाहायला मिळाले.
या खास भेटीची झलक ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, कलाकारांमधील मैत्री, त्यांचा उत्साह आणि रेस्टॉरंटमधील आनंददायी वातावरणाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
Tharala Tar Mag : स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट! डोहाळ जेवणात सायलीला अटक
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार ऋतुजाच्या ‘फुडचं पाऊल’ या रेस्टॉरंटला भेट देताना दिसत असल्याने ते कलाकारांचे आवडते ठिकाण बनत असल्याची चर्चा आहे. अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही ऋतुजा बागवेने आपली वेगळी छाप पाडल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्येही या भेटीची चांगलीच चर्चा रंगली असून, कलाकारांच्या या खास गेट-टुगेदरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.