Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haiwaan Box Office Collection: ‘हैवान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घसरण; दोन दिवसांत ‘फक्त’ इतक्या कोटींची कमाई

Haiwaan Box Office Collection: अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या ‘हैवान’ने दुसऱ्या दिवशी २.५० कोटींची कमाई केली. दोन दिवसांत चित्रपटाचा गल्ला ५.५० कोटींवर पोहोचला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 13, 2026 | 08:40 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Haiwaan Box Office Collection:अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘हैवान’ हा क्राइम-थ्रिलर चित्रपट सध्या चर्चेत आहे. मोठ्या स्टारकास्टसह प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईची अपेक्षा होती. मात्र, प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान अंश’ आणि ‘मिर्झापूर: द मूवी’ या चित्रपटांचा दबदबा कायम असल्याने ‘हैवान’ला त्याचा फटका बसताना दिसत आहे.

दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घसरण

इंडस्ट्री ट्रॅकर सॅक्निलकच्या आकडेवारीनुसार, ‘हैवान’ने पहिल्या दिवशी ७,२२४ शोजमधून ३ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याऐवजी मोठी घसरण झाली. शनिवारी ५,७५९ शोजमधून ‘हैवान’ने केवळ २.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई ५.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या ऑक्युपन्सीवर नजर टाकली तर एकूण ऑक्युपन्सी १२.७७ टक्के इतकी होती. यामध्ये संध्याकाळच्या शोला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळाला असून त्या वेळची ऑक्युपन्सी १६ टक्के होती. मात्र, दोन दिवसांनंतरही चित्रपट १० कोटींच्या आकड्यापासून दूर आहे. त्यामुळे आगामी रविवार आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये ‘हैवान’च्या कमाईत किती वाढ होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सध्या बॉक्स ऑफिसवर विविध जॉनरचे अनेक चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. ‘मिर्झापूर: द मूवी’, ‘हनुमान अंश’, ‘मंदादी’, ‘सरदार २’, ‘एपिक’ आणि ‘व्हिडिओ’ यांसारखे चित्रपट सिनेमागृहात सुरू आहेत. यापैकी ‘हनुमान अंश’ आणि ‘मिर्झापूर: द मूवी’ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमार आणि सैफ अली खानचा ‘हैवान’ या स्पर्धेत कितपत टिकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

काय आहे ‘हैवान’ची कथा?

‘हैवान’ची कथा श्याम नावाच्या एका नेत्रहीन व्यक्तीभोवती फिरते. सैफ अली खानने श्यामची भूमिका साकारली आहे. एका रिटायर्ड जज आणि रहस्यमयी महिलेशी संबंधित गुंतागुंतीच्या प्रकरणात श्याम अडकतो आणि त्याच्या आयुष्याला धोकादायक वळण मिळतं. पुढे त्याचा सामना बदला घेण्याच्या भावनेने पेटलेल्या बेरहम किलर परशुरामशी होतो. अक्षय कुमारने परशुरामची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत बोमन इराणी, सैयामी खेर, श्रिया पिळगावकर आणि शारिब हाशमी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. अभिनेता मोहनलाल यांचाही चित्रपटात खास कॅमिओ आहे.

विशेष म्हणजे ‘हैवान’ हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शन यांच्या मल्याळम ‘ओप्पम’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘ओप्पम’मध्ये मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Web Title: Haiwaan box office collection day 2 akshay kumar saif ali khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywood movies
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Haiwaan: सैफ अली खान की अक्षय कुमार, कोण ठरला सर्वाधिक मानधन घेणारा? ‘हैवान’ची फी ऐकून व्हाल थक्क!
1

Haiwaan: सैफ अली खान की अक्षय कुमार, कोण ठरला सर्वाधिक मानधन घेणारा? ‘हैवान’ची फी ऐकून व्हाल थक्क!

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा
2

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य
3

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
4

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.