Katrina Kaif London look: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Katrina Kaif : बॉलिवूडची कतरिना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आली. कारण ही तसचं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कतरिनाने एक छोटा चिमुकल्यांला जन्म दिला. त्याचे नाव विहान ठेवण्यात आले. मुलांच्या जन्मानंतर कतरिना बऱ्याच काळासाठी कॅमेऱ्यापासून लांब राहिली. ना एअरपोर्ट लूक, ना कोणता इव्हेंट, ती कुठेच दिसत नव्हती. Katrina Kaif London look:
गणपतीच्या वेळी फक्त एकदा ती विकीसोबत अंबानींच्या घरी आरतीला आली. तेव्हा तिला सोशलमीडियावर जोरदार ट्रोल केलं. तिच्या वजनावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिला खूप करण्यात आलं. बाळंतणांनतर तिच्या वजनावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. ही गोष्ट भाईजानला पण आवडली नाही. त्याने ट्रोलर्सचे कानउघडणी केली. ट्रोलिंगनंतर फक्त एका महिन्यातच कतरिनाने असा पुनरागमन करत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली.
कतरिना KayBeauty स्वतःचा ब्युटी ब्रँड आहे. त्या ब्रँडच्या लंडनमधील एका वर्षपूर्तीच्या कार्यक्रमासाठी ती तिथे गेली होती. तिला बघण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. तिचा लूक पाहून सगळेच थक्क झाले. चेहऱ्यावर तोच जुना ग्लो, एकदम स्टायलिश कपडे आणि मोकळे सुंदर केस.
फक्त एका महिन्यात तिने स्वतःमध्ये एवढा बदल कसा केला याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. त्यादिवशी तिने चॉकलेट ब्राऊन रंगाचा ड्रेप स्कर्ट घातला होता, त्यावर एक टेलर ब्लेझर आणि आतमध्ये ब्लॅक टॉप. पायात साधे बेली शूज आणि हातात एक छोटी ब्लॅक बॅग.
लूक एकदम सिंपल पण खूप क्लासी वाटत होता. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते तिच्या केसांनी. तिचे लांब, मोकळे, शायनी केस बघून लोकांनी तिला लगेच विनंती करायला सुरुवात केली.
तिचे फोटो समोर येताच कमेंटचा पाऊस पडला. एका फॅनने लिहिले, “कतरिना प्लीज आता ब्युटी प्रोडक्ट्स सोबत हेअर केअर प्रोडक्ट्स पण लाँच कर.” तर दुसरा म्हणाला, “ट्रोलर्सना मस्त चपराक बसली आहे.”अजून एकाने लिहिले की, “तिला ट्रोल करण्यापूर्वी लोक विसरले होते की ती कतरिना आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे ठिकाणी पार पडला. लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांनी गुडन्यूज दिली. त्यांच्या मुलाचे नाव विहान आहे.






