Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये मोठा बदल; बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा, प्रोमो व्हायरल

Kon Honar Crorepati: Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी या बॉलिवूडच्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नावाचा अंदाज व्यक्त केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 12:29 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टच्या खुर्चीवर आता मराठमोळी अभिनेत्री
  • नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता
  • प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी माधुरी दीक्षितच्या नावाचा अंदाज केला व्यक्त
Kon Honar Crorepati: कोण होणार करोडपती’ कार्यक्रमाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यंदाच्या पर्वात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या शोचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, यंदा ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टच्या खुर्चीत कोण बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधीच्या पर्वांमध्ये स्वप्नील जोशी, नागराज मंजुळे आणि सचिन खेडेकर यांनी ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन केले आहे. मात्र, यंदाच्या पर्वासाठी निर्मात्यांनी एक वेगळा चेहरा निवडल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, यावेळी एका अभिनेत्रीच्या हाती या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

फिल्मफेअर सोहळ्यात पाहुण्यांना मिळाली होस्टची झलक

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अनेक मराठी कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. अमृता फडणवीस, रेणुका शहाणे, अभिजीत सावंत, वैभव तत्त्ववादी, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर यांच्यासह अनेक कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांना ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टची पहिली झलक दाखवण्यात आल्याचे समोर आले. ही झलक पाहिल्यानंतर उपस्थित कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता पाहायला मिळाली. मात्र, हा नवा होस्ट नेमका कोण आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

प्रोमोमध्ये दिसली नव्या होस्टची झलक

आता सोनी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati)चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नव्या होस्टची झलक पाहायला मिळत आहे. प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्स करत या अभिनेत्रीबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांच्या मते, ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टच्या भूमिकेत बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित दिसणार आहे. प्रोमोमधील संकेतांमुळे माधुरी दीक्षितच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

माधुरी दीक्षित होणार ‘कोण होणार करोडपती’ची होस्ट?

माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय आणि नृत्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे ती ‘कोण होणार करोडपती’सारख्या लोकप्रिय मराठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्यास हा तिच्या चाहत्यांसाठीही खास क्षण ठरणार आहे.

मात्र, अद्याप सोनी मराठीकडून ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे माधुरी दीक्षितच या शोची होस्ट आहे का, हे अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चांमुळे माधुरी दीक्षितला ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टच्या खुर्चीत पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.

Web Title: Kon honar crorepati major change bollywood actress madhuri dixit host the show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • madhuri dixit
  • marathi show
  • Sachin khedekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.