Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

Legacy: कलामकारचे सह-संस्थापक अंकित खन्ना, KR$NA आणि Raftaar यांनी SVF Entertainmentच्या सहकार्याने या शोची निर्मिती केली आहे. शोने हिंदी ZEE5 ला आपला अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर म्हणून घोषित केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Legacy: भारतातील लोकप्रिय रॅप रिअॅलिटी शो ‘Legacy’ आता हिंदी ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलामकारचे सह-संस्थापक अंकित खन्ना, KR$NA आणि Raftaar यांनी SVF Entertainmentच्या सहकार्याने या शोची निर्मिती केली आहे. शोने हिंदी ZEE5 ला आपला अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर म्हणून घोषित केलं आहे.

दर मंगळवार आणि शुक्रवारी पाहता येणार शो

या भागीदारीनुसार ‘Legacy’चे नवीन एपिसोड दर मंगळवार आणि शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता हिंदी ZEE5 वर एक्सक्लुझिव्हली स्ट्रीम होणार आहेत. यासोबतच शोचे एपिसोड्स कलामकार म्युझिकच्या YouTube चॅनेलवरही उपलब्ध असतील.

विशेष म्हणजे, प्रत्येक एपिसोड कलामकार म्युझिकच्या YouTube चॅनेलवर प्रदर्शित होण्याच्या सुमारे ४० तास आधी हिंदी ZEE5 वर प्रीमियर होणार आहे. त्यामुळे ZEE5च्या सब्सक्रायबर्सना शोचे एपिसोड्स आधी पाहण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय, ‘Legacy’चा फिनाले म्हणजेच १७वा एपिसोड केवळ हिंदी ZEE5 वर उपलब्ध असेल.

नव्या हिप-हॉप टॅलेंटला मिळणार व्यासपीठ

‘Legacy’चा उद्देश भारतातील हिप-हॉप क्षेत्रातील नव्या पिढीतील कलाकारांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हा आहे.

शोमध्ये केवळ लोकप्रियतेला महत्त्व न देता गीतलेखन, मौलिकता, कथाकथन, कलात्मक प्रगती आणि प्रामाणिकपणा या गोष्टींवर भर दिला जात आहे. देशभरातील उदयोन्मुख रॅपर्सना एकत्र आणून त्यांना आपल्या कलेचा विकास करण्याची संधी या शोच्या माध्यमातून मिळत आहे.

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

प्रत्येक एपिसोडला लाखोंमध्ये व्ह्यूज

प्रीमियरपासूनच ‘Legacy’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलामकार म्युझिकच्या YouTube चॅनेलवरील शोच्या एपिसोड्सना सातत्याने ८.५ लाख ते १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हिंदी ZEE5 सोबतची भागीदारी भारतातील स्वतंत्र हिप-हॉप कम्युनिटीसाठी दीर्घकालीन व्यासपीठ उभारण्याच्या शोच्या प्रयत्नांना आणखी बळ देणार आहे.

अंकित खन्ना म्हणाले…

कलामकारचे सह-संस्थापक अंकित खन्ना यांनी या भागीदारीबद्दल सांगितलं की, कलामकारने नेहमीच केवळ हिट गाणी तयार करण्याऐवजी कलाकार घडवण्यावर विश्वास ठेवला आहे. ‘Legacy’ ही त्याच विचारसरणीचं प्रतिबिंब असून, टॅलेंटमध्ये गुंतवणूक करणे, मौलिकतेला प्रोत्साहन देणे आणि दीर्घकाळ परिणाम घडवणाऱ्या संधी निर्माण करणे हा शोचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

KR$NA आणि Raftaar यांनीही व्यक्त केला विश्वास

KR$NA यांनी भारतात टॅलेंटची कमतरता नसली तरी हिप-हॉपला योग्य पद्धतीने समजून घेणाऱ्या व्यासपीठांची गरज असल्याचं म्हटलं. ZEE5च्या माध्यमातून या कलाकारांचा आणि त्यांच्या प्रवासाचा मोठ्या प्रेक्षकांपर्यंत विस्तार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर Raftaar यांनी हिप-हॉप हा नेहमीच आपल्या मनातील खरं सांगणाऱ्या लोकांना आवाज देणारा प्रकार असल्याचं सांगितलं. ‘Legacy’मध्ये टॅलेंटचं मूल्यमापन आकडे किंवा लोकप्रियतेवर नव्हे, तर कौशल्य, जिद्द आणि मौलिकतेवर केलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आता दर मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी ७ वाजता हिंदी ZEE5 वर ‘Legacy’ पाहता येणार असून, या रॅप रिअॅलिटी शोचा फिनाले विशेष आकर्षण ठरणार आहे.

Web Title: Legacy krna raftaar rap reality show hindi zee5 streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • zee5

संबंधित बातम्या

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा
1

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
2

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
3

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
4

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.