Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samar Khalkatkar: मॉडेलिंग ते मराठी सिनेमा! समर खळतकरची क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

Samar Khalkatkar: मॉडेलिंग आणि हिंदी वेबविश्वातून मनोरंजन क्षेत्रात ओळख निर्माण करणारा समर खळतकर आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. लोकप्रिय युवा वेबसीरिज ‘कॅम्पस बीट्स’च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर तो क्रांती रेडकर वानखेडे दिग्दर्शित ‘मैत्रेया’ या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 07, 2026 | 06:45 PM
Samar Khalkatkar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Samar Khalkatkar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • समर खळतकरचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
  • क्रांती रेडकरांच्या ‘मैत्रेया’मध्ये महत्त्वाची भूमिका
  • २० नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित
मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी केवळ देखणं व्यक्तिमत्त्व पुरेसं नसतं, तर त्याला अभिनयाची जोड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्दही लागते. मॉडेलिंगच्या दुनियेतून आपल्या प्रवासाला सुरुवात करणारा समर खळतकर आता अभिनयाच्या क्षेत्रात नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

हिंदी मनोरंजनविश्वात ओळख

फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँडसाठी मॉडेलिंग केल्यानंतर त्याने अभिनयाकडे मोर्चा वळवला. लोकप्रिय युवा वेबसीरिज ‘कॅम्पस बीट्स’च्या पाचव्या सीझनमधील सहभागामुळे त्याला हिंदी मनोरंजनविश्वात ओळख मिळाली. आता याच अनुभवाची शिदोरी घेऊन तो क्रांती रेडकर वानखेडे दिग्दर्शित ‘मैत्रेया’ या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.Samar Khalkatkar:

मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या भावविश्वाशी

मॉडेलिंगमधून मिळालेला कॅमेऱ्यासमोरचा आत्मविश्वास, ‘कॅम्पस बीट्स’मधून मिळालेला अभिनयाचा अनुभव आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा अशा टप्प्यांतून समरचा हा प्रवास घडला आहे. हिंदी मनोरंजनविश्वातील तरुणाईच्या कथांनंतर आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘मैत्रेया’मधील त्याची भूमिका मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या भावविश्वाशी जोडलेली असून त्याचा सहज वावर आणि आकर्षक स्क्रीन प्रेझेन्स या भूमिकेला नवा रंग देणार आहे. अभिनयासोबतच समरचं नृत्यसकौशल्यही अप्रतिम आहे. नृत्याची आवड आणि त्यातील कौशल्य यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी लाभली आहे. त्यामुळे समरच्या या मराठी पदार्पणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sourav Joshi Troll: कंटेंटसाठी प्रायव्हसीचा विसर! गोव्यात पत्नीचा व्हिडिओ काढल्याने लोकप्रिय युट्यूबरवर टीकेची झोड

विविध पैलू अनुभवता

समर म्हणतो, “कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मला ‘मैत्रेया’सारखा चित्रपट मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयाचे विविध पैलू अनुभवता आले आणि माझ्या भूमिकेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहाता आलं. क्रांती मॅम यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. ‘मैत्रेया’मधील माझं काम प्रेक्षकांना आवडेल आणि त्यांच्या मनात माझ्यासाठी एक खास जागा निर्माण होईल, अशी आशा आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची माझी इच्छा आहे.”

Vandana Gupte: पहिला खून माझाच होईल!’ वंदना गुप्तेंच्या पतीचा मिश्कील टोला; बाळासाहेबांशी जोडलेला किस्सा चर्चेत

या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी ‘मैत्रेया’मधून मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या आयुष्यात उमलणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडली आहे. समरसोबत आयुषी, स्काय आणि रुची हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. येत्या २० नोव्हेंबरला ‘मैत्रेया’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. मॉडेलिंगपासून वेबविश्व आणि आता मराठी सिनेमापर्यंतचा समरचा हा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतो, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Samar khalkatkar marathi film debut maitreya movie rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : अमेरिकेची मोठी घोषणा; इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती द्या आणि मिळवा २० दशलक्ष डॉलर
1

World News : अमेरिकेची मोठी घोषणा; इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती द्या आणि मिळवा २० दशलक्ष डॉलर

Ranbir Kapoor’s Ramayana Movie: रामायणातल्या ‘या’ ५ चुका पाहून व्हाल हैराण! रावणाची भक्ती गायब, शूर्पणखेचा ग्लॅमरस अवतार!
2

Ranbir Kapoor’s Ramayana Movie: रामायणातल्या ‘या’ ५ चुका पाहून व्हाल हैराण! रावणाची भक्ती गायब, शूर्पणखेचा ग्लॅमरस अवतार!

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: दमदार परफॉर्मन्स आणि बजेटही फिट! भारतातील ५ स्वस्त टर्बो पेट्रोल SUV
3

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: दमदार परफॉर्मन्स आणि बजेटही फिट! भारतातील ५ स्वस्त टर्बो पेट्रोल SUV

Nagpur News : ८० शेडवर चालला बुलडोझर मनपा-नासुप्रची संयुक्त मोहीम; कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर कारवाई
4

Nagpur News : ८० शेडवर चालला बुलडोझर मनपा-नासुप्रची संयुक्त मोहीम; कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.