Maza Chakula Marathi Movie: 'माझा छकुला' मधला तो हमाल (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Hasya Jatra Fame Actor Sachin Goswami: ‘माझा छकुला’ हा मराठीतला असा सिनेमा आहे जो कधीच जुना होत नाही. आजही टीव्हीवर लागला की लोक आवडीने बघतात. लहान मुलगा आणि त्याच्या आईची गोष्ट असलेला हा सिनेमा सगळ्यांच्याच जवळचा आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे बालकलाकार होता. छोटा, आगाऊ, मस्तीखोर पण तितकाच हुशार मुलगा. त्याच्या आईच्या भूमिकेत निवेदिता सराफ होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, मधू कांबीकर अशी मोठी स्टारकास्ट होती. या सिनेमात एक असा कलाकार पण होता ज्याला तुम्ही आता ओळखू पण शकणार नाही. ते म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधला सचिन गोस्वामी आहेत. ‘Majha Chhakula Hasya Jatra Frame:
सिनेमात एक सीन आहे जिथे आदिनाथ आणि त्याची आई निवेदिता सराफ मुंबईला येतात. स्टेशनवर उतरल्यावर एक हमाल येतो आणि जबरदस्तीने त्यांची बॅग उचलतो. त्यावरून त्यांच्यात थोडा वादपण होतो. तो छोटासा हमालाचा रोल करणारा मुलगा दुसरा कोणी नसून सचिन गोस्वामी आहेत.तेव्हा तो रोल खूपच लहान होता. आता त्याचा फोटो बघितला तर तोच आहे का असं वाटतं. कारण आता सचिन गोस्वामी खूप बदलला आहे. ‘हास्यजत्रा’ मध्ये आपण त्याला दिग्दर्शक म्हणून बघतात.
अनेकांना वाटतं की सचिन गोस्वामी ‘हास्यजत्रा’ मुळे प्रसिद्ध झाला. पण त्याचा प्रवास खूप आधीपासून सुरू झाला होता. त्यांनी लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली होती. ‘माझा छकुला’ सारख्या मोठ्या सिनेमात काम केलं होतं. निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. पुढे कॉमेडी शोच्या दिग्दर्शनात आपलं नाव मोठं केलं.
अनेक कॉमेडी शो दिग्दर्शित केले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा तो मुख्य दिग्दर्शक आहे. त्याच्यामुळेच तो शो इतका हिट झाला आहे. त्याने अनेक कलाकारांना घडवलं आहे.
Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
सोशल मीडियावर जेव्हा लोकांना कळलं की ‘माझा छकुला’ मधला हमाल सचिन गोस्वामी आहे, तेव्हा सगळेच थक्क झाले. लोक म्हणत आहेत की अरे हा तोच आहे का? विश्वासच बसत नाही. कारण तेव्हाचा सचिन आणि आताचा सचिन यात जमीन आस्मानचा फरक आहे. परंतू मराठी सिनेमाचा इतिहास खूप मोठा आहे.
अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा खूप मजा येते. ‘माझा छकुला’ आजही लोकांच्या मनात आहे आणि आता त्यातल्या त्या छोट्या हमालाची पण चर्चा सगळीकडे होत आहे.






