Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Mangle : मराठी कलाकरांना हिंदी सिनेमात घृणास्पद वागणूक? वैभव मांगलेंनी केला खुलासा; “आपल्याला घाटी म्हणून…”

Vaibhav Mangle यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे. मराठी कलाकारांना हिंदी इंडस्ट्रीत दुय्यम वागणूक दिली जाते तसेच त्यांना ‘घाटी’ म्हणून संबोधले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • वैभव मांगलेंच्या या पोस्टने चर्चेची पालवी फुटली आहे.
  • तसेच पोस्टच्या शेवटी Trollers ला आधीच दिले उत्तर!
  • मराठी कलावंतांना ‘घाटी’ या उपमेने संबोधले जाते.
Vaibhav Mangle यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये मराठी कलाकारांना कशी वागणूक मिळते? किंवा कशाप्रकारे वागवले जाते? याबद्दल खुलासा केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टने मराठी सिनेचाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु केली आहे. वैभव मांगले यांच्यामते मराठी कलाकाराला हिंदी सिनेविश्वात नेहमी दुय्यम वागणूक मिळते. मराठी कलाकाराला मुख्य भूमिका मिळू नये म्हणून प्रयत्न केले जातात तसेच मराठी कलावंतांना ‘घाटी’ या उपमेने संबोधले जाते.

हिंदी-मराठी इंडस्ट्रीत अधिराज्य, क्रॉसओव्हर क्वीन ठरतेय सई ताम्हणकर!

अभिनेत्याने पोस्टमध्ये नमूद केले की…

वैभव मांगले यांनी त्यांच्या Facebook Handle वरून पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “हे ‘मराठी’ कलाकार हिंदीत चमकले, चमकत आहेत किंवा चमकतील, याचं फालतू कोडकौतुक आधी बंद केलं पाहिजे. तिथे चमकलं म्हणजे आपणच भारी कलाकार आहोत का? हा पूर्ण बिनडोकपणा आहे. आम्ही इथे काम करतो, इथले लोक आमच्यावर प्रेम करतात. हिंदीत नाव कमावलं म्हणून मराठी रसिक कुणाला विशेष मान देत नाहीत आणि तिथेही कुणी मराठी कलाकारांना हिरो किंवा हिरोईन म्हणून घेत नाही. बहुतांश वेळा मराठी पार्श्वभूमी असलेल्या भूमिकाच दिल्या जातात. Madhuri Dixit आणि Nana Patekar यांना सोडले, तर फार कुणाला तिथे खरी किंमत दिली जात नाही. मराठी कलाकारांना ‘घाटी’ म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या मनात आपल्या कलाकारांविषयी एक प्रकारचा आकस आहे. मराठी कलाकारांना कधीच योग्य मान मिळाला नाही. म्हणजे आमचं कमी अस्सल आणि तेच अव्वल, अशी ही फालतुगिरी आहे. Prashant Damle, Umesh Kamat, Priya Bapat, Bharat Jadhav, Mukta Barve, Nirmiti Sawant, Makarand Anaspure, Prasad Oak, Spruha Joshi यांसारखे कलाकार अत्यंत महत्त्वाचे आणि खूप मोठे कलाकार आहेत. धन्यवाद”.

Trollers ला आधीच दिले उत्तर…

वैभव मांगलेंच्या या पोस्टने चर्चेची पालवी फुटली आहे. तसेच पोस्टच्या शेवटी त्यांनी नमूद केले आहे की, “आता काही महाभाग असं म्हणतील की, ‘याला कुणी काम दिलं नाही म्हणून हे बोलतोय.’ पण त्यांना सांगून ठेवतो, मला त्या इंडस्ट्रीचं कधीच आकर्षण वाटलं नाही. तिथे काही केलं तरच आपण भारी आहोत, असंही मला कधी वाटलं नाही.”

‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर, मराठी ZEE5वर 29 मे रोजी

चाहत्यांनी केले समर्थन…

वैभव मांगलेंच्या चाहत्यांनीही हिंदी सिनेसृष्टीच्या या कृत्याविषयी राग व्यक्त केला आहे. तसेच अनेकांचे म्हणणे आहे की “याआधीही आमच्या मराठी सिनेविश्वात अनेक अष्टपैलू कलाकार झाले. त्यापैकी अनेकांनी हिंदी सिनेमात कामही केले. परंतु, त्यांना अनेकदा Side Role दिले किंवा घरगड्याचं काम देण्यात आलं.”

Web Title: How marathi actors are being treated in hindi cinemas vaibhav mangle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 06:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.