
फोटो सौजन्य - Social Media
मराठी सिनेसृष्टीत आता Trnsformation पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीने सिनेमांची दिशा बदलली आहे. ‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळबंद 2’ या सिनेमांनी मराठी प्रेक्षकांमध्ये मराठी सिनेमाबद्दलची व्याख्या बदलली आहे आणि या नव्या व्याख्येला मराठी प्रेक्षक पसंतही करत आहे, याचे साक्षीदार स्वतः या सिनेमाचे Box Office कलेक्शन आहे. राजा शिवाजी सिनेमाने 100 कोटी पार केलेच आहेत पण देऊळबंद 2 सिनेमाही लवकरच 100 कोटींचा आकडा पार करणार आहे. अशामध्ये ‘मर्दिनी’ या मराठी सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला आहे.
Mardini Trailer Out!
Mardini या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमात एका आईची गोष्ट दाखवण्यात आली आहे. आपल्या मुलीला एकटीने सांभाळणारी आई आणि त्यामागचा तिचा संघर्ष या चित्रपटात पाहता येणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली एक विशेष गोष्ट म्हणजे सध्या झुरळाला घाबरणारी एक स्त्री जेव्हा आपल्या मुलीवर संकट ओढवतं तेव्हा ती साक्षात दुर्गेच्या अवतारात येऊन क्रुरवृत्तीचा नायनाट करते.
सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे झळकली आहे. तर बालकलाकार मायरा वैकुलही या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेता श्रेयस तळपदेने केले आहे. तसेच श्रेयस स्वतः या सिनेमाचा निर्माता आहे.